World Cup : एका वर्षात मनोरंजन करणाऱ्या मुलांनी पटकावलं विजेतेपद

समुद्र किनाऱ्यावर खेळणारे अशी त्यांची ओळख होती. ते जिथंही जायचे तिथं मनोरंजन करायला कॅलिप्लो क्रिकेटर्स आले असं म्हटलं जायचं.

  • Share this:

1975 ला खेळण्यात आलेल्या पहिल्या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावून वेस्ट इंडिजने क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांत कोरलं. त्याआधी 1970 च्या दशकात क्रिकेटमध्ये दोनच देशांचं वर्चस्व होतं. ते दोन देश म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड.

वेस्ट इंडीज म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर खेळणारा देश एवढीच ओळख होती. ते जिथंही जायचे तिथं त्यांना मनोरंजन करायला कॅलिप्सो क्रिकेटर्स आले असं म्हटलं जायचं. वेस्ट इंडिजच्या संगीताला कॅलिप्सो असं म्हणतात. त्यांना संघ असं न म्हणता 11 मुलं असंच म्हटले जायचेय

1974 मध्ये संघाचे नेतृत्व क्लाईव्ह लॉइड यांच्याकडे सोपवलं आणि वेस्ट इंडीजच्या क्रिकेटमध्ये बदल झाला. क्लाईव्ह लॉइडने 11 कॅलिप्सो क्रिकेटर्सचे एका संघात रुपांतर केलं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी गोलंदाजांना सांगितलं की तुम्हाला किती धावा हव्यात त्या मी देतो पण मला विजय पाहिजे. आपल्याला जिंकायचं आहे हा विश्वास त्यांनी संघात निर्माण केला.

क्लाईव्ह लॉइड यांनी संघात बदल केले. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज उसळत्या चेंडूंचा मारा करायचे. तेव्हा संघामध्ये रॉबर्टस, होल्डर आणि होल्डिंग या गोलंदाजांना घेतलं तर ग्रीनिज आणि विवियन रिचर्ड्स या फलंदाजांना संधी दिली. क्लाईव्ह लॉइडनी गोलंदाजांना सांगितलं होतं की, ऑस्ट्रेलियन गोलंदाज बाउन्सर टाकणार असतील तर आपल्याला सुद्धा टाकता येतात.

क्लाईव्ह लॉइड यांचा सल्ला गोलंदाजांनी मनावर घेतला. इंग्लंडचे क्रिकेटपटू डेव्हिड स्टीली यांनी म्हटलं की याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशिवाय कोणत्याच खेळाडूंनी अशी गोलंदाजी केली नव्हती. त्यानंतर क्लाईव्ह लॉइड़ यांच्याच नेतृत्वाखाली पहिल्या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावून वेस्ट इंडीजने पटकावले होते.

1975 नंतर 1979 च्या वर्ल्ड कपमध्ये क्लाईव्ह लॉइड यांनी ग्रीनिज आणि रिचर्ड्स यांना फलंदाजीसाठी वरती पाठवले आणि आपण खालच्या क्रमांकावर खेळले. या वर्ल्ड कप स्पर्धेतच ग्रीनिज आणि रिचर्ड्स यांची फलंदाजी दिसून आली.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजची अवस्था 4 बाद 99 झाली होती. त्यावेळी रिचर्ड्सनी 157 चेंडूत नाबाद 138 धावांची खेळी केली. याच खेळीने वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा जगज्जेता केलं. त्यानंतर रिचर्ड्स यांनी म्हटलं होतं की, क्लाईव्ह लॉइड यांच्यासारखा दुसरा कर्णधार पाहिला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 12:18 PM IST

ताज्या बातम्या