World Cup : विराटचं जिंकून देणार भारताला वर्ल्ड कप, 'हे' आकडे पाहून तुमचाही विश्वास बसेल

विराटनं दक्षिण आफ्रिकेविरोधात विराटनं 66.78च्या सरासरीनं 1269 धावा केल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 12:05 PM IST

World Cup : विराटचं जिंकून देणार भारताला वर्ल्ड कप, 'हे' आकडे पाहून तुमचाही विश्वास बसेल

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत वगळता इतर सर्व संघ एक-एक सामना खेळले आहेत. तरी, भारतीय संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना बुधवारी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. साऊथ आफ्रिका संघानं आतापर्यंत दोन्ही सामन्यात पराभव मिळवला आहे. त्यामुळं त्यांना भारताविरोधात सामना जिंकावाच लागणार आहे.

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत वगळता इतर सर्व संघांनी एक-एक सामना खेळला आहे. तरी, भारतीय संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना बुधवारी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. साऊथ आफ्रिका संघानं आतापर्यंत दोन्ही सामन्यात पराभव मिळवला आहे. त्यामुळं त्यांना भारताविरोधात सामना जिंकावाच लागणार आहे.

दरम्यान आकडे पाहिल्यास भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकहाती भारताला सामना जिंकवून देऊ शकतो. त्यामुळं विराट कोहलीच्या खेळाकडे सगळ्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरोधात विराट कोहलीनं आतापर्यंत चार शतक लगावले आहे. ते चारही सामने भारतानं जिंकले आहे. त्यामुळं जर या सामन्यातही विराटनं शतकी खेळी केली तर, दक्षिण आफ्रिकेविरोधात भारत सामना जिंकलेच.

Loading...

विराट कोहलीचा हा तिसरा वर्ल्ड कप आहे. खास गोष्ट म्हणजे विराटनं प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये शतकी खेळी केली आहे. 2011मध्ये बांगलादेशविरोधात शतकी खेळी केली होती. त्यानंतर 2015मध्ये पाकिस्तान विरोधात शतक ठोकले होते. त्यामुळं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराटनं शतक ठोकल्यास त्याच्या शतकांची हॅट्रीक होईल.

विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिका विरोधात चांगला रेकॉर्ड आहे. त्यांच्याविरोधात विराट फलंदाजी करणे जास्त सोयीचे मानतो. दक्षिण आफ्रिकेविरोधात विराटनं 66.78च्या सरासरीनं 1269 धावा केल्या आहेत. त्यामुळं बुधवारी होणाऱ्या सामन्यात विराटची बॅट चालली तर, त्याचा फायदा भारताला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...