भेलपुरीवाल्याकडून आईला समजला मुलाचा सहा षटकारांचा पराक्रम

भेलपुरीवाल्याकडून आईला समजला मुलाचा सहा षटकारांचा पराक्रम

भारतीय क्रिकेट संघांचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रींनी एका षटकात सहा षटकार मारल्यानंतर ती गोष्ट घरी सांगितली नव्हती.

  • Share this:

मुंबई, 27 मे : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांचा आज वाढदिवस आहे. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघासोबत ते इंग्लंडला गेल आहेत. रवि शास्त्री त्यांच्या बिनधास्त फलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. याशिवाय फिरकी गोलंदीजीसुद्धा करायचे.

रवि शास्त्रींच्या आयुष्यातील क्रिकेटशी जोडलेले अनेक किस्से आजही सांगितले जातात. त्यांनी 1985 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेटमध्ये चॅंम्पियन्स ऑफ चॅम्पियन चा पुरस्कार पटकावला होता. हा विशेष असण्याचं कारण त्यांना ऑड़ी कार मिळाली होती. त्यावेळच्या आठवणी शास्त्रींच्या आईने मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या होत्या.

रवि शास्त्रींना मिळालेली कार घराच्या गॅरेजमध्ये लावलेली असायची. क्रिकेटच्या सामन्यांमुळे शास्त्री फारसे घरी नसायचे. तेव्हा कार पाहण्यासाठी अनेकजण याय़चे. तेव्हा शास्त्रींचे आई-वडील ती कार लोकांना दाखवायचे. याबद्दल रवि शास्त्रींना पुसटशी कल्पनाही नव्हती. शास्त्रींच्या आईने मुलाखतीत म्हटले होते की, लोक जेव्हा कार दाखवा म्हणायचे तेव्हा त्यांना नकार देणं शक्य व्हायचं नाही.

रवी शास्त्रींनी 1985 मध्येच झालेल्या रणजी ट्रॉफीत खेळताना एकाच षटकात 6 षटकार मारण्याची कामगिरी केली होती. त्यांच्या या कामगिरीची माहिती कशी मिळाली याचा रंजक किस्सा शास्त्रींच्या आईने शेअर केला होता. त्यांनी सांगितले की, त्या दिवशी संध्याकाळी रवि शास्त्री घरी आले आणि पुढच्या दिवसासाठी बॅग पॅक करायला लागले. तेव्हा आईने विचारले की, आजच्या सामन्यात काय झाले? त्यावर शास्त्रींनी संध्याकाळी 7.30 च्या मराठी बातम्या बघ असं उत्तर दिलं. त्यानंतर मी भाजीपाला आणायला गेले. तेव्हा एका भेलपुरी वाल्याने सांगितलं की रविने सहा षटकार मारले.

भारताकडून रवि शास्त्रींनी 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी 3 हजार 830 धावा केल्या असून त्यात 11 शतके, 2 द्विशतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही त्यांनी 151 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 4 शतके आणि 50 अर्धशतकांसह 3 हजार 108 धावा केल्या आहेत. तर 129 विकेट घेतल्या आहेत.

SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?

First published: May 27, 2019, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading