World Cup : पाकिस्तानचा सामना कसा करणार? विराटनं दिलं हे उत्तर

भारतीय संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली.

  • Share this:

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 साठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. त्याआधी कर्णधार विराट कोहली आणि संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनी आपण वर्ल्ड कप जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

कोहली आणि शास्त्री दोघेही म्हणाले की, भारतीय संघ यावेळी पूर्ण ताकदीने उतरणार असून प्रतिस्पर्धी संघ पाहून खेळणार नाही. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्य़ा पाकिस्तानसोबत 16 जूनला सामना होणार आहे. याबद्दल विचारले असता कोहलीने सांगितलं की, कोणत्याही एका संघासाठी वेगळी रणनिती असणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीनिशी खेळणार असल्याने समोर कोणता संघ आहे याने फरक पडणार नाही.

आम्ही एका संघाचा विचार नाही करू शकत. संपूर्ण स्पर्धेचा विचार करून खेळ करण्याचा प्रयत्न राहील. पाकिस्तान सोडून इतरही बलाढ्य संघ आहेत त्यामुळे एका संघाचा विशेष विचार करणार नाही असे कोहली म्हणाला.

विराट म्हणाला की, प्रत्येक संघासाठी वेगवेगळं विचार करायचं म्हटलं तर खेळावर लक्ष्य केंद्रीत करता येणार नाही असं कोहलीने सांगितलं. प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, वर्ल्ड कपमध्ये एका संघाबद्दल विचार नाही करू शकत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या