रुका ना वो झुका ना वो ! 'या' घटनेनं कोलमडला होता कोहली पण हिंमत न हरता खेळला सामना

रुका ना वो झुका ना वो ! 'या' घटनेनं कोलमडला होता कोहली पण हिंमत न हरता खेळला सामना

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

  • Share this:

लंडन, 04 जून: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यंदा तिसरा विश्वचषक खेळत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळं विराटवर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचे दडपण असणार आहे. विराट कोहलीला जगातला सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. त्याच्या फलंदाजीचे चाहते फक्त भारतातच नाही तर, जगभरात आहेत. पण विराटचा हा प्रवास तितका सोपा नव्हता, त्याच्या करिअरच्या सुरुवातीलाच त्याला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागले की, त्याची खेळण्याची हिंमतच झाली नाही. विराटनं मात्र आपले क्रिकेट थांबवले नाही, म्हणूनच आज तो जगातला नंबर 1चा खेळाडू बनला आहे.

विराटनं आपल्या करिअरची सुरुवात करताच, त्याच्या बाबांचे निधन झाले. त्यावेळी तो दिल्लीकडून रणजी क्रिकेट खेळत होता. हा काळ त्याच्या जीवनातला सर्वात खडतर काळ होता. रणजी सामना सुरु असतानाच, विराटनं आपले कोच राजकुमार शर्मा यांना फोनवरुन आपल्या वडिलांच्या निधनांची बातमी सांगितली. त्यावेळी रणजी सामना खेळायचा की नाही, या द्विधा मनस्थितीत होता. मात्र त्यानं माघार घेतली नाही, आणि तो सामना खेळला.

एक अशी घटना आणि बदललं विराटचं आयुष्य

डिसेंबर 2006चा तो दिवस विराट कोहली कधीच विसरु शकत नाही. 18 वर्षांचा कोहली कर्नाटक विरोधात रणजी सामना खेळत होता. कर्नाटकनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 446 धावा केल्या होत्या. तर, दिल्ली संघावर 14 धावांवर 4 विकेट अशी नामुष्की ओढवली होती. त्यावेळी कोहलीनं मोर्चा सांभाळत, 40 धावांची नाबाद खेळी केली.

संघाला विजय मिळवून दिला, मग केले वडिलांवर अंतिम संस्कार

आपल्या वडिलांच्या निधनानंतरही विराटनं क्रिकेटचे मैदान सोडले नाही. त्याला अशा अवस्थेत मैदानावर आलेले पाहून पंच, खेळाडू, रेफरी हैरान झाले. त्यावेळी कोहली फक्त मैदानावर उतरला नाही तर, त्यानं 90 धावांची खेळी आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. तो तब्बल 281 मिनिटे मैदानावर हजर होता. त्यानं 238 चेंडूंचा सामना करत दिल्लीला हरण्यापासून वाचवले. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर त्या दिवशी इतिहास लिहिला गेला. आज तोच मुलगा भारताला विश्वचषक जिंकवून देणार आहे.

वाचा-World Cup : विराटपुढे धर्मसंकट ! कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार दक्षिण आफ्रिकेविरोधात संधी

वाचा-World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

CET परीक्षेचा आज निकाल, यासोबतच इतर महत्त्वाचा 18 घडामोडी

First published: June 4, 2019, 10:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading