'धोनीशिवाय तुम्ही जिंकूच शकत नाही', दिग्गज परदेशी क्रिकेटर कॅप्टन कूलच्या बाजूने मैदानात

'धोनीशिवाय तुम्ही जिंकूच शकत नाही', दिग्गज परदेशी क्रिकेटर कॅप्टन कूलच्या बाजूने मैदानात

पराभवासाठी अनेकांनी महेंद्रसिंह धोनीला जबाबदार धरत त्याच्यावर निशाणा साधला.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये झालेल्या भारताच्या परभवाची मोठी चर्चा झाली. या पराभवासाठी अनेकांनी महेंद्रसिंह धोनीला (M S Dhoni) जबाबदार धरत त्याच्यावर निशाणा साधला. पण आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर स्टीव्ह वॉ धोनीच्या बाजूने मैदानात उतरला आहे.

'धोनीशिवाज सामना जिंकण्याचा कोणतीच संधी निर्माण होत नाही. धोनीने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने खेळत राहिला आहे. तो तुम्हाला जिंकण्याची परिस्थिती निर्माण करू शकतो आणि त्याच्याशिवाय सामना जिंकणं कठीण गोष्ट आहे,' असं म्हणत स्टीव्ह वॉ यांनी महेंद्रसिंह धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ICC Cricket World Cupमध्ये भारतानं सेमीफायनलमध्ये खराब फलंदाजी केली. त्यामुळं भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि न्यूझीलंडनं फायनलमध्ये प्रवेश केला. पराभवानंतर भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी मान्य केले की, चौथ्या क्रमांकानं भारतीय संघाचा घात केला. रवी शास्त्री यांनी पराभवानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत भारताची कमकुवत बाजू सांगितली.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी, "चौथे स्थान हे आमच्यासाठी या वर्ल्ड कपमध्ये चिंतेचा विषय राहिला आहे. सुरुवातीला केएल राहुलला या स्थानावर संधी दिली होती. मात्र, शिखर धवन जखमी झाल्यानंतर राहुलला सलामीसाठी उतरवण्यात आले. त्यानंतर विजय शंकरही जखमी झाला. त्यामुळं चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आमच्यासमोर कायम होता". त्यामुळं आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर भारताला मधली फळी सावरू शकली नाही. अखेर जडेजा आणि धोनीनं भारताची बाजू सावरली. दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. मात्र जडेजा आणि धोनी भारताचा पराभव रोखू शकले नाही.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात केवळ 24 धावांत भारताचे चार फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना हैराण केले.

...म्हणून धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवले

मयंक अग्रवालला सलामीला पाठवून राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याबाबत शास्त्रींना विचारले असता, "असे बदल नेहमीचा चालतात असे नाही. जर आणखी एक सामना असता, तर असे बदल केले असते", असे सांगितले. तर धोनीबाबत बोलताना, "धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवणे हा संघाचा निर्णय होता. धोनी चांगला फिनीशर आहे, त्यामुळं आम्हाला त्याची गरज होती. त्याकरिता त्याला आम्ही उशीरा फलंदाजीसाठी पाठवले", असे सांगितले.

Zomato डिलीव्हरी बॉयला रॉडने बेदम मारहाण, हॉटेल मालकाचा VIDEO व्हायरल

First published: July 13, 2019, 1:48 PM IST

ताज्या बातम्या