World Cup : AUSvsSL : लंकेचा डंका वाजवून 'कांगारूं'ची प्रथम क्रमांकावर विजयी 'उडी'!

World Cup : AUSvsSL : लंकेचा डंका वाजवून 'कांगारूं'ची प्रथम क्रमांकावर विजयी 'उडी'!

ICC Cricket World Cup 2019 : Aus vs Sl : फिंचने 132 चेंडूत 153 धावा केल्या तर स्टीव्हन स्मिथने 59 चेंडूत 73 धावा केल्या.

  • Share this:

ओव्हल, 15 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने लंकेचा डंका वाजवत शानदार विजय मिळवला आहे. फिंचच्या दीडशतकी खेळीच्या बळावर उभारलेला 334 धावांचा डोंगर लंकेच्या टीमला पार करता आला नाही. अवघा संघ 247 धावांवर 45.5 षटकात गारद झाला. आॅस्ट्रेलियाने लंकेवर 87 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

334 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात दमदारी राहिली. कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी फटकेबाजी करत धावफलक उंचावला. दिमुथ करुणारत्ने 97 धावा करून बाद झाला. अवघ्या ३ धावांमुळे त्याचं शतक हुकलं. त्यानंतर कुशल परेरा 52 धावा करून बाद झाला. त्यानंतर लंकेचा डाव पत्याचा बंगल्याप्रमाणे कोसळला. कुशल मेंडिसने 30 धावा करून एकाकी झुंज दिली पण तीही अपयशी ठरली. एकापाठोपाठ एक खेळाडू बाद होते गेले आणि अवघा संघ 45.5 षटकात 247 सर्वबाद झाला.

त्याआधी नाणेफेक जिंकून श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाना प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने कर्णधार अॅरॉन फिंचच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 334 धावांचा डोंगर उभा केला होता. अॅरॉन फिंचने 132 चेंडूत 153 धावा केल्या तर स्टीव्हन स्मिथने 59 चेंडूत 73 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी 80 धावांची भागिदारी केली. डेव्हिड वॉर्नर 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा 10 धावा करून बाद झाला.

ख्वाजा बाद झाल्यानंतर फिंच आणि स्टीव्हन स्मिथने 173 धावांची भागिदारी केली. फिंचचे दीडशतक पूर्ण झाल्यानंतर त्याला उदनाने बाद केलं. त्यानंतर स्टीव्हन स्मिथला मलिंगाने बाद केलं. स्मिथनंतर श़ॉन मार्श 3 धावा, अॅलेक्स कॅरी 4 धावा तर पेंट कमिन्स शून्यावर धावबाद झाले.लंकेकडून उदाना आणि धनंजय डीसिल्वाने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

गुणतक्त्यात इंग्लंड दुसऱ्या स्थानी पोहचला असून भारताची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरण झाली. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघांना एक गुण देण्यात आला. आता भारताचे पाच गुण झाले होते. सध्या पहिल्या क्रमांकावर 7 गुणांसह न्यूझीलंड असून रनरेटच्या जोरावर इंग्लंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. लंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यामुळे पहिल्या स्थानावर पोहचली आहे.

India Vs Pakistan : काळाबाजार तेजीत, एका तिकीटाची 'इतकी' किंमत!

World Cup : भारताविरुद्ध पाकिस्तानचा खेळाडू वापरणार 'विराट'अस्त्र

World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!

==============================

First published: June 15, 2019, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading