….म्हणून तहान-भूक विसरून वर्ल्डकप खेळतोय साऊथ आफ्रिकेचा 'हा' फलंदाज

साऊथ आफ्रिकेचा हा खेळाडू सध्याच्या क्रिकेट जगातला खरा जेंटलमन असल्याचे बोलले जाते.

  • Share this:

साऊथ आफ्रिकेचा धमाकेदार फलंदाज हाशिम आमला हा 36 वर्षांचा असूनही युवा खेळाडूंना लाजवेल अशी खेळी करतो. त्याचा फिटनेस अगदी एखाद्या 20 वर्षांच्या खेळाडूसारखा आहे. त्याचा फिटनेस पाहून भलेभले फलंदाज हैरान होतात. सध्या विश्वचषकात साऊथ आफ्रिकेकडून खेळणारा अमला पहिल्या विश्वचषक विजयासाठी सज्ज आहे.

साऊथ आफ्रिकेचा धमाकेदार फलंदाज हाशिम अमला हा 36 वर्षांचा असूनही युवा खेळाडूंना लाजवेल अशी खेळी करतो. त्याचा फिटनेस अगदी एखाद्या 20 वर्षांच्या खेळाडूसारखा आहे. त्याचा फिटनेस पाहून भलेभले फलंदाज हैरान होतात. सध्या विश्वचषकात साऊथ आफ्रिकेकडून खेळणारा अमला पहिल्या विश्वचषक विजयासाठी सज्ज आहे.

सध्या साऊथ आफ्रिकेचा संघ सराव सामने खेळत असून त्यांचा पहिला सामना इंग्लंड विरोधात 30 मेला होणार आहे. मात्र सध्या अमला तहान भूक विसरुन फलंदाजी करत आहे. कारण रमजानचा महिना सुरु असल्यानं तो, रोजा पाळत आहे.

अमलाने स्वत: एकदा पत्रकार परिषदेत रोजा पाळत मैदानात भर उन्हात खेळणे कठिण जाते. मात्र यामुळं माझं मन मजबूत असतं. म्हणून मी सामना सुरु असतानाही रोजा पाळतो.

अमला जेवढा क्रिकेटच्या मैदानात संयमी आणि एकनिष्ठ असतो, तसाच तो आपल्या धर्माचेही काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळं रोजा पाळतच त्यानं वेस्ट इंडिज विरुद्धचा सराव सामना खेळला.

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सराव सामन्यात हाशिम अमलानं अर्धशतकांची खेळी केली होती. एवढेच नाही तर अमला कैसर लागर या दारुच्या ब्रॅण्डचा लोगो असलेली आपल्या संघाची जर्सी वापरत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 09:09 PM IST

ताज्या बातम्या