South Africa Vs West Indies : पावसामुळे सामना रद्द, आफ्रिकेची वाट बिकट

South Africa Vs West Indies : पावसामुळे सामना रद्द, आफ्रिकेची वाट बिकट

ICC Cricket World Cup 2019 : South Africa Vs West Indies : दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कपमधील आव्हान धोक्यात आलं असून त्यांची पुढची वाट बिकट झाली आहे.

  • Share this:

साउथॅम्पटन, 10 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करलेल्या दक्षिण आफ्रिकेला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजयाची आवश्यकता होती. मात्र पावसाने त्यांच्या खेळावर पाणी फिरवलं. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका प्रथम फलंदाजीला उतरली पण 7.3 षटकांचाच खेळ होऊ शकला. या खेळानंतर पावसाला सुरुवात झाली. शेवची सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात पाक्सितानविरुद्ध विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. यात पाकिस्तान, बांगलादेश आणि भारताने त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी आफ्रिकेला आजचा सामना जिंकण्याची गरज होती.

सामना रद्द झाल्याने वेस्ट इंडिजला एक तर दक्षिण आफ्रिकेला एक गुण मिळाला. वेस्ट इंडिजचे तीन सामने झाले असून एक विजय आणि एक पराभव झाला आहे. या एका गुणासह एकूण तीन गुण झालेल्या वेस्ट इंडिजने गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांनी श्रीलंका आणि पाकिस्तानला मागे टाकलं. दोन्ही संघ अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. तर दक्षिण आफ्रिका 4 सामन्यातील तीन पराभवासह नवव्या स्थानी असून त्यांची सेमीफायनलला पोहचण्याची वाट बिकट झाली आहे.रॉबिन राउंड पद्धतीने सामने होत असल्याने प्रत्येक संघाला 9 सामने खेळता येणार आहेत. यात 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवणारा संघ पुढच्या फेरीत पोहचू शकतो. आता आफ्रिकेला पुढचे सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

वाचा- युवराजच्या कारकिर्दीला पूर्णविराम ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वाचा- Farewell Yuvi! युवराजने निवृत्ती जाहीर करताच आईला कोसळलं रडू

वाचा- तब्बल साडे तीन वर्ष कॉफी डेटसाठी तरसला होता रोमान्स किंग युवराज सिंग

वाचा-रक्ताच्या उलट्या होत असतानाही भारताला जिंकवून दिला होता युवराजनं वर्ल्ड कप


क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 09:08 PM IST

ताज्या बातम्या