World Cup च्या इतिहासात पहिल्या सामन्यात असं कधीच झालं नव्हतं

ICC Cricket world cup दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू Imran Tahir ने पहिल्या षटकात सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद करून इंग्लंडला दणका दिला.

  • Share this:

वर्ल्ड कपच्या महासंग्रामाला ओव्हलवर सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीला पाचारण केलं. कर्णधाराचा निर्णय पहिल्याच षटकात सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरने पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला दणका दिला.

फिरकीपटू इम्रान ताहिरने पहिलं षटक टाकलं. इंग्लंडचे जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो सलामीला आले होते. ताहिरने बेअरस्टोला यष्टीरक्षक डी कॉककडे झेल देण्यास भाग पाडलं. इंग्लंडला ताहिरच्या पहिल्या षटकात फक्त एक धाव काढता आली.

पहिल्या सामन्याच्या पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रानने कमाल केली. त्याने जॉनी बेअरस्टोला यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हाती झेल देण्यास भाग पाडलं. वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच षटकात विकेट घेणारा  इम्रान पहिला फिरकीपटू ठरला आहे.

वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत पहिल्याच षटकात अशी कामगिरी दुसऱ्यांदा झाली आहे. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा जॉन राइट बाद झाला होता. त्याला क्रेग मॅकडरमॉटने बाद केलं होतं.

इम्रान ताहिर 2015 च्या वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिकेचा सर्वात अनुभवी फिरकीपटू म्हणून ओळखला जात आहे. त्याने भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे. आतापर्यंत 59 सामन्यात 92 गडी बाद केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 03:57 PM IST

ताज्या बातम्या