World Cup : चोकर्सचा ठप्पा मिटवण्यासाठी साऊथ आफ्रिकेचा संघ सज्ज

World Cup : चोकर्सचा ठप्पा मिटवण्यासाठी साऊथ आफ्रिकेचा संघ सज्ज

साऊथ आफ्रिकेच्या संघानं 1992, 1999, 2007 आणि 2015मध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती.

  • Share this:

लंडन, 29 मे : विश्वचषकासाठी अगदी काही तासांचा कालवधी उरला असताना, क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला उद्या सुरुवात होत आहे. या रणसंग्रामात सलामीचा सामना होणार आहे तो साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड यांच्या विरोधात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांनी एकदाही विश्वचषक जिंकलेले नाही.

मात्र आतापर्यंत सर्व विश्वचषकात कायम कागदावर बलाढ्य दिसणार कोणत्या देशाचा संघ असेल तर, तो देश आहे साऊथ आफ्रिका. गेली कित्येक वर्षे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासह विश्वचषक खेळण्यासाठी साऊथ आफ्रिकेचा संघ मैदानात उतरतो. मात्र आजवर एकदाही चॅम्पियन बनण्याचा मान त्यांना मिळाला नाही. म्हणूनच त्यांना चोकर्स असं संबोधलं जात. फाफ डुप्लेसीसच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेचा संघ यंदाही कागदावर बलाढ्य दिसत आहे. मात्र विश्वचषकाआधीच त्यांना मोठा फटका बसला आहे, त्यांचा जलद गोलंदाज डेल स्टेन याने दुखापतींमुळं माघार घेतली आहे.

चारवेळा सेमीफायनलपर्यंत मजल पण...

साऊथ आफ्रिकेच्या संघानं 1992, 1999, 2007 आणि 2015मध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र एकदाही त्यांना विजतेपद मिळवता आलेले नाही. म्हणूनच त्यांना चोकर्स असे नाव पडले. सध्या साऊथ आफ्रिकेचा संघ आयसीसी रॅंकिंगमध्ये तीसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या हंगामात त्यांनी स्पर्धा पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडसोबत होणार आहे.

पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात पावसानं केला घात

1992 साली पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेचा संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला होता. आणि आपल्या पहिल्याच विश्वचषकात हा संघ सर्व संघांना भुल देऊन थेट उपांत्य फेरीत पोहचला. इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात 252 धावांचा पाठलाग करत असताना, 22 चेंडूत केवळ 13 धावांची गरज असताना, पंचांनी पावसामुळं सामना थांबवला. पावसानं त्यांचा घात केला आणि केवळ 1 चेंडूत 22 धावा करण्याची त्यांच्यावर वेळ आली, आणि अर्थात साऊथ आफ्रिकेनं हा सामना गमावला. क्रिकेटच्या इतिहासतला ही सर्वात गाजलेली किस्सा मानला जातो. त्यानंतर 1999, 2007 आणि 2015मध्ये साऊथ आफ्रिका उपांत्य फेरी पर्यंत पोहचली पण त्यांना चॅम्पियन हा टॅग कधीच मिळाला नाही.

साऊथ आफ्रिकेचा संघ : फाफ डुप्लेसीस, क्विंटन डी कॉक, हाशिम आमला, एडेन मार्करम, रेसी वैन डर डुसां, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, प्रिस्टोरियस, फेलुकवायो, डेल स्टेन, रबाडा, लुंगी एन्गिडी, एनरिज नॉर्तजे, इमरान ताहिर आणि तबरेज शम्सी.

वाचा-वर्ल्डकपआधी साऊथ आफ्रिकेला मोठा धक्का, 'हा' मुख्य खेळाडू स्पर्धेबाहेर

वाचा- आता हेच राहिलं होतं, धोनी झाला बांगलादेशचा कर्णधार!

वाचा-World Cup : केएल राहुलच्या एका शतकामुळं होणार 'या' तीन खेळाडूंचा पत्ता कट

वाचा-धोनीनं लावली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO व्हायरल

टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

First published: May 29, 2019, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading