World Cup : 'सारा ओव्हल मुझे गब्बर के नाम से जानता है', धवनचा VIDEO व्हायरल

तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा ओव्हलच्या मैदानावर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 11:53 AM IST

World Cup : 'सारा ओव्हल मुझे गब्बर के नाम से जानता है', धवनचा VIDEO व्हायरल

ओव्हल, 10 जून : ICC Cricket World Cupच्या इतिहासात 1999नंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला आव्हानाचा पाठलाग करताना पराभव स्विकारावा लागला. भारतानं 36 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. यात मोलाचे योगदान दिले ते, शिखर धवन यानं. शिखर धवननं वर्ल्ड कपच्या इतिहासात 20 वर्षांनी पुन्हा ओव्हलवर भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केलं. या सामन्यात धवननं 117 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचे आव्हान उभा केलं. शिखर धवनच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 17 वे शतक आहे. या शतकासह त्याने ओव्हलवर इतिहासाची पुनरावृत्ती केली.

शिखर धवनच्या आधी भारताकडून फक्त एकाच फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये शतक केलं होतं. असी कामगिरी मधल्या फळीतील फलंदाज अजय जडेजाने 20 वर्षांपूर्वी 1999 मध्ये केली होती. विशेष म्हणजे ओव्हलवरच जडेजाने शतकी खेळी केली होती. त्याने 100 धावा केल्यानंतरही भारताला पराभव पत्करावा लागला होता.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मार्क वॉच्या 83 धावांच्या जोरावर 282 धावांचं आव्हान भारताला दिलं होतं. आता 350 धावा कमी वाटत असल्या तरी 20 वर्षांपूर्वी ते मोठं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. यंदा ओव्हलवर समालोचन करणारा सौरव गांगुली 8 धावांवर आणि सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाले होते. तेव्हा भारताकडून जडेजाने 138 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय रॉबिन सिंगने 75 धावा केल्या होत्या. हे दोघे वगळता इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. यामुळे भारतीय संघ 48.2 षटकांत 205 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळं याच मैदानावरची धवनची ही खेळी खास ठरली. त्यामुळं त्यानं स्वत:, सारा ओव्हल मुझे गब्बर के नाम से जानता है ! असे ट्विट केले.शिखर धवनला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. तर, सामन्यानंतर चहलनं धवनची मुलाखत घेतली. यावेळी धवननं आपली सिग्नेचर स्टेप करून दाखवली.20 वर्षांनी पुन्हा त्याच मैदानावर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केलं. धवनने हे शतक फक्त 95 चेंडूत पूर्ण केलं. 109 चेंडूंचा सामना करताना 14 चौकारांच्या सहाय्याने शिखर धवनने 117 धावा केल्या.

वाचा-World Cup : मैदान तर जिंकलं, पण चाहत्यांच्या 'या' कृतीमुळे विराटनं मागितली स्मिथची माफी

वाचा- Point Table : विराटसेनेची विजयी घौडदौड, पण गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर 'हा' संघ

वाचा-20 साल बाद... ओव्हलवर त्या खेळीची आठवण पुन्हा ताजी

वाचा- World Cup : ‘ही’ आकडेवारी सांगते विराटसेनाच होणार जग्गजेता !


VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजप मंत्र्याचं धक्कदायक विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...