World Cup : विराटची चिंता वाढली, धडाकेबाज सलामीवीर पुढच्या सामन्याला मुकणार?

भारताचा पुढचा सामना गुरुवारी न्यूझीलंड विरोधात होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 09:14 AM IST

World Cup : विराटची चिंता वाढली, धडाकेबाज सलामीवीर पुढच्या सामन्याला मुकणार?

लंडन, 11 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ सध्या आपली विजयी घौडदौड कायम राखण्याच्या तयारीत आहे. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेनंतर कांगारुंची शिकार केली. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरोधात होणार आहे. मात्र या सामन्याआधी विराटच्या चिंता वाढल्या आहेत. ऑस्टर्लिया विरोधात धमाकेदार शतक करणारा शिखर धवन न्यूझीलंड विरोधात खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळं क्षेत्ररक्षण करताना शिखर मैदानावर दिसला नाही. दरम्यान त्याची दुखापत स्कॅन करण्यात आली असून, त्याच्या अंगठ्लाया सूज आल्याचे यात निष्पण्ण झाले आहे. धवनच्या दुखापतीवर चर्चा करुन फिजीओ पैट्रीक फरहार्ट गुरूवारी न्यूझीलंड विरोधात धवन खेळणार की नाही याबाबत खुलासा करणार आहे. फलंदाजी दरम्यान जलद गोलंदाज कुल्टर नाईलचा चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता. त्यानंतरही तो फलंदाजी करत असतो. मात्र त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करता आले नाही. त्याच्या जागी रविंद्र जडेजाने क्षेत्ररक्षण केले.

धवनने लगावले 17वे शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शिखर धवननं 117 धावांची शतकी खेळी केली. आयसीसी टुर्नामेंटमधले धवनचे हे 6वे शतक आहे तर, वर्ल्ड कपमधले तीसरे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धवनचे हे चौथे शतक आहे.

धवन खेळला नाही तर, कोणाला मिळणार संधी

Loading...

धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं तो खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान, शिखर धवन न्यूझीलंड विरोधात खेळला नाही तर, विजय शंकरची संघात वर्णी लागू शकते. केएल राहुल आणि रोहित शर्मा सलामीसाठी येऊ शकतात आणि विजय शंकर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरु शकतो.

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

वाचा-फायनल सामन्यात 11 खेळाडू निलंबित, संघाने गमावली वर्ल्ड कप खेळण्याची संधी

VIDEO : लंडनमध्ये मॅच पाहायला पोहोचला विजय मल्ल्या, लोकांनी केलं असं 'स्वागत'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...