World Cup : शाकिबने रचला इतिहास, कपिल देव-युवराज सिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी!

ICC Cricket World Cup 2019 अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने अफगाणिस्तानविरुद्ध बांगलादेशला एकहाती विजय मिळवून दिला.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 04:31 PM IST

World Cup : शाकिबने रचला इतिहास, कपिल देव-युवराज सिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी!

ICC Cricket World Cup 2019 मध्ये बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर बांगलादेशनं अफगाणिस्तानला पराभूत केलं.

शाकिब अल हसनने फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत 5 विकेट घेत त्याने इतिहास रचला. वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा क्रिकेटपटू आहे.

वर्ल्ड कपमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि 5 विकेट घेण्याची कामगिरी यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केली होती. त्याने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडविरुद्ध अर्धशतक आणि 5 विकेट घेतल्या होत्या.

बांगलादेशकडून वर्ल्ड कपमध्ये 5 विकेट घेणारा शाकिब अल हसन पहिला खेळाडू ठरला आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 400 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 10 विकेट घेणारा तो एकमेव खेळाडू आहे.

शाकिब अल हसनने वर्ल्ड कपमध्ये 6 सामन्यात 2 शतक आणि तीन अर्धशतके केली आहेत. त्याच्या खात्यात आता 476 धावा असून फक्त एका सामन्यात 50 धावा करता आल्या नाहीत. 95 च्या स्ट्राइक रेटनं धावा करण्याऱ्या शाकिबने 10 विकेट घेतल्या आहेत.

Loading...

अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना त्याने 69 चेंडूत 51 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना 29 धावात 5 गडी बाद केले. यात एक षटक निर्धाव टाकले. शाकिब अल हसन सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे.

शाकिब अल हसनने वर्ल्ड कपमध्ये शतक आणि एकाच सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी आतापर्यंत फक्त दोन खेळाडूंनी केली आहे.

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार कपिल देव आणि 2011 च्या वर्ल्ड कप विजयात मोलाची कामगिरी करणारा युवराज सिंग यांच्यानंतर शाकिब तिसरा खेळाडू ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...