पठाणी सूटवर ब्लेझर घातलं म्हणून सर्फराज झाला ट्रोल; टीकेला 'असं' दिलं उत्तर

इतर कर्णधारांसारखा पोशाख केला नाही याचा मला अभिमान असल्याचं सांगत सर्फराजने आपल्या वेगळेपणाचं कारण सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: May 31, 2019 07:48 PM IST

पठाणी सूटवर ब्लेझर घातलं म्हणून सर्फराज झाला ट्रोल; टीकेला 'असं' दिलं उत्तर

क्रिकेटच्या महासंग्रामाला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्याच सामन्यात पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, पाकचा कर्णधार वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे.

वर्ल्ड कप सुरु होण्याआधी सर्व कर्णधारांनी बकिंगहम पॅलेसमध्ये महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला त्याच्या पोषाखाने ट्रोल केलं गेलं.

महाराणी एलिझाबेथ यांना भेटताना सर्व कर्णधारांनी शर्ट-पॅन्ट आणि सूट परिधान केला होता. पण पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने सलवार कमीज घातली होती. त्याच्यावर जॅकेट घातलं होतं.

Loading...

सर्फराजच्या या वेगळेपणावर सोशल मीडियातून ट्रोलर्सनी जोरदार हल्लाबोल केला. सर्फराजने एका मुलाखतीवेळी यावर उत्तर दिलं.

सर्फराज म्हणाला की, मी घातलेला पोषाख हा राष्ट्रीय पोषाख आहे. मला बोर्डाने आदेश दिले होते की राष्ट्रीय पोषाखाला प्रमोट करा.

एक कर्णधार म्हणून मला गर्व आहे की मी  एकट्यानेच राष्ट्रीय पोषाख घातला होता असंही सर्फराजने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...