IND vs WI : सचिनला भारतीय संघात नको आहे शमी, हॅट्ट्रिक करूनही नाकारण्याचे 'हे' आहे कारण

IND vs WI : सचिनला भारतीय संघात नको आहे शमी, हॅट्ट्रिक करूनही नाकारण्याचे 'हे' आहे कारण

मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती.

  • Share this:

लंडन, 26 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आतापर्यंतचा अपराजित संघ आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतानं 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे. भारतानं ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांना नमवले आहे तर, न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला होता. तर, गुरुवारी भारतीय संघ वेस्ट इंडिज विरोधात भिडणार आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघासमोर मोठी अडचणी आहे. भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार फिट झाल्यामुळं मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात येणार की नाही,याबाबत साशंकता आहे. दरम्यान आता या समस्येवर महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं आपले मत व्यक्त केले आहे.

भारताच्या गोलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. भुवनेश्वर कुमारने तीन सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. तर शमीने पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यामुळे प्लेइंग इलेव्हन ठरवताना विराटची डोकेदुखी वाढली आहे. सध्या बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार हे चौघे संघात आहेत. शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात घेतल्यानंतर तो पाचवा गोलंदाज आहे. तर हार्दिक पांड्यानेसुद्धा गोलंदाजी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध भुवनेश्वरला दुखापतीने उतरता आले नाही. त्याच्याजागी खेळणाऱ्या मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली शमीच्या या जबरदस्त कामगिरीने अंतिम अकरा जणांची निवड करणं कठीण झालं आहे.

सचिनला संघात नको शमी

सचिन तेंडुलकरनं स्टार स्पोर्टसला दिलेल्या मुलाखतीत, "भुवनेश्वर कुमार जर तंदुरुस्त असेल तर, त्याला संघात स्थान दिले पाहिजे. मला शमी आणि भुवनेश्वर यांच्यात विचारल्यास मी भुवीची निवड करेन. वेस्ट इंडिज विरोधात ख्रिस गेलला रोखायचे असेल तर संघात भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात यावी", असे मत व्यक्त केले.

वेस्ट इंडिज विरोधात भुवनेश्वर कुमारचा रेकॉर्ड चांगला

भुवनेश्वर कुमारनं वेस्ट इंडिज विरोधात 15 सामने खेळले आहेत. त्यात 15 विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिज विरोधात 29 धावा देत 3 विकेट हा त्याचा सर्वोत्तम खेळ आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भुवीनं 4 सामन्यात दोन वेळा गेलला बाद केले आहे. त्यामुळं गेलवर दबाव टाकण्यासाठी भुवीला संघात स्थान देणे महत्त्वाचे आहे.

वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर...

वाचा- इंग्लंडच्या पराभवाने तीन संघांना दिलासा, कोण गाठणार सेमीफायनल?

वाचा- World Cup : इंग्लंडचा पराभवाने पाकचा फायदा, दुसऱ्यांदा जग्गजेते होणार?

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

First published: June 26, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या