'त्या' फोन कॉलमुळे वर्ल्ड चॅम्पियन संघात खेळू शकला सचिन

'त्या' फोन कॉलमुळे वर्ल्ड चॅम्पियन संघात खेळू शकला सचिन

2007 च्या वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतरच सचिनने निवृत्ती घेण्याचा विचार केला होता.

  • Share this:

ओव्हल, 03 जून : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने समालोचन करून आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 16 नोव्हेंबर 2013 ला निवृत्ती घेतली होती. सचिनने 2007 मध्येच सचिननं क्रिकेटला रामराम करण्याचा विचार केला होता. त्याचा विचार कृतीत येण्याआधी आलेल्या एका फोन कॉलने त्याने नंतर निवृत्ती न घेण्याचा निर्णय घेतला.

वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हिवियन रिचर्ड्स यांच्या सल्ल्यानंतर सचिनने त्याचा विचार बदलला होता. याचा खुलासा सचिनने एका कार्यक्रमात केला आहे. यावेळी व्हिवियन रिचर्ड्ससुद्धा उपस्थित होते.  आतापर्यंत अनेकदा सचिनने 2007 मध्ये निवृत्तीचा विचार केला होता हे . पण पहिल्यांदाच त्याने व्हिवियन रिचर्ड्स यांच्यामुळे निवृत्तीचा विचार डोक्यातून काढून टाकल्याचं सांगितलं.

सचिन म्हणाला की, क्रिकेट कारकिर्दीत 2007 चा वर्ल्ड कप सर्वात वाईट ठरला. तेव्हा वाटलं की आता खूप क्रिकेट झालं तेव्हा थांबलं पाहिजे. त्या वेळी मोठ्या भावाने 2011 च्या वर्ल्ड कप फायनलचा शेवटचा सामना मुंबईत होणार आहे आणि तु कल्पना कर वर्ल्ड कप तुझ्या हातात असेल असं सांगितलं.

भावासोबत चर्चा केल्यानंतर सचिन तिथून निघून गेला आणि त्यानंतर व्हिवियन रिचर्ड्स यांचा फोन आला. ते सचिनला म्हणाले की, तुझ्यात अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. सचिन आणि व्हिवियन रिचर्ड्स यांच्यात अर्धा-पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेनं सचिनच्या मनावर सकारात्मक परिणाम झाला. ज्या व्यक्तिला तुम्ही आदर्श मानता त्यांचा फोन येणं हीच खूप मोठी गोष्ट असते. त्यांच्या फोननंतर मी निवृत्तीचा विचार सोडला आणि माझ्या कामगिरीतही सुधारणा झाली असं सचिनने सांगितलं.

व्हिवियन रिचर्ड्स म्हणाले की, मला सचिनवर विश्वास होता. भारताचा लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर सचिन आणि आता विराट कोहली आले. पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लहान दिसणारा खेळाडू इतका शक्तीशाली कसा असू शकतो.

वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात

वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट

VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'

First published: June 3, 2019, 4:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading