World Cup : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करणार पदार्पण!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमधून आता सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 10:41 AM IST

World Cup : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करणार पदार्पण!

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये आजपासून सुरुवात होणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर पहिला सामना होणार आहे. हा सामना भारतीयासाठी खास असाच असणार आहे.

मैदानावर आपल्या बॅटने चाहत्यांची मने जिंकून त्यावर अधिराज्य गाजवलेला मास्टर ब्लास्टर समालोचकाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये आपल्या फलंदाजीने मैदान गाजवलेला सचिन आता समालोचन करताना बघायला मिळणार आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 2 हजार 278 धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक अर्धशतके आणि शतकांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

Loading...

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज भारतीय खेळाडू समालोचन करताना दिसले आहेत. यात माजी कर्णधार सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग या खेळाडूंचा समावेश आहे.

फक्त पहिल्याच सामन्यात नाही तर भारताच्या सामन्यावेळीसुद्धा सचिन समालोचन करताना दिसेल. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 जूनला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...