हा कसला वर्ल्ड कप, स्पर्धेतील बदलावर सचिन नाराज

क्रिकेटच्या महासंग्रामाच्या आधी भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

क्रिकेटच्या महासंग्रामाला आजपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना होणार आहे. या सामन्याच्या आधी भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदा वर्ल्ड कप स्पर्धेचं स्वरुपाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

साखळी पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या वर्ल़्ड कप स्पर्धेत दहाच संघांना खेळता येणार आहे. सचिनने यावर नाराजी व्यक्त करताना वर्ल्ड कपमध्ये जास्त संघांना खेळण्याची संधी मिळायला पाहिजे असं म्हटलं आहे.

लहान संघांना वर्ल्ड कपमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. सचिन म्हणाला की, वर्ल्ड कप म्हणतो तर यात जगाने सहभागी झालं पाहिजे. आपल्याला जास्ती जास्त संघ सहभागी करून घेण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत. हे करत असताना क्रिकेटचा दर्जा आणि नियमांचा भंग होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवा असं सचिनने म्हटलं.

याआधी वर्ल्ड कपमध्ये 14 संघांना सहभागी होता येत असे. मात्र रॉबिन राऊंड प्रकाराने स्पर्धा घेतल्याने दहा संघांना संधी मिळाली. यामुळे झिम्बॉम्बे, आयर्लंड, नेदरलँड, युएईसारख्या देशांना संधी मिळू शकली नाही.

या स्पर्धेत 27 वर्षांनी राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्घतीने संघ एकमेकांसोबत खेळतील. यामुळे स्पर्धेत मोठी रंगत येणार आहे. मात्र, यामुळे टॉपच्या संघांसाठी ही धोक्याची घंटा असण्याची शक्यता आहे.

राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही टॉप 4 मध्ये पोहचू शकतात.

1992 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत या पद्धतीने सामने झाले होते. यात न्यूझिलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीनुसार 1 नंबरच्या न्यूझिलंड आणि 4 नंबरवर राहिलेल्या पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. यामध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 4 विकेटने न्यूझिलंडला पराभूत करून फायनल गाठली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचा तिसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेसोबत सामना झाला होता. यात इंग्लंडने बाजी मारली होती.

राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीत सर्व संघ एकमेकांशी लढतात. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. सर्व दहा संघांना प्रत्येकी 9 सामने खेळण्याची संधी मिळेल. यातील टॉपचे 4 संघ सेमीफायनलला पोहचतील त्यानंतर बाद फेरी होईल. यात पहिल्या क्रमांकावरील संघ आणि चौथ्या क्रमांकावरील संघांची लढत होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ लढतील.

1975 ते 1987 पर्यंत चार वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रुप स्टेज आणि नॉकआउट पद्धतीने सामने झाले. 1992 ला राउंड़ रॉबिन पद्धतीने सामने खेळले गेले. त्यानंतर 1996 ला पुन्हा ग्रुप स्टेज आणि नॉकआउट पद्धतीने स्पर्धा झाली. 1999 ते 2003 या काळात ग्रुप स्टेज आणि सुपर सिक्स पद्धत अवलंबली गेली. त्यानंतर 2007 ते 2015 दरम्यान तीन वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेज आणि नॉकआउट पद्धतीने सामने झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 12:53 PM IST

ताज्या बातम्या