World Cup केदार जाधवच्या जागी जडेजाला संघात घ्यावं, सचिनचा सल्ला

ICC Cricket World Cup 2019 : अष्टपैलू खेळाडू असलेल्या जडेजाने इंग्लंडविरुद्ध अफलातून झेल घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 05:26 PM IST

World Cup केदार जाधवच्या जागी जडेजाला संघात घ्यावं, सचिनचा सल्ला

बर्मिंगहम, 01 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत बलाढ्य अशा भारताला पराभूत करून इंग्लंडनं त्यांचं आव्हान जिवंत ठेवलं. भारताच्या पराभवानंतर पुन्हा एकदा संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केदार जाधवच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्याऐवजी रविंद्र जडेजाला संघात स्थान द्यायला हवं असंही सचिनने म्हटलं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताचा सलामीवीर केएल राहुल जखमी झाल्यानं बाहेर गेला. यावेळी जडेजा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. त्याने जेसन रॉयचा अफलातून झेल पकडून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धसुद्धा बदली खेळाडू म्हणून उतरल्यावर त्याने झेल घेतला होता. त्यामुळं जडेजाला संघात संधी मिळावी अशी चर्चा केली जात आहे.

सचिन तेंडुलकरने भारताच्या पराभवानंतर बोलताना केदार जाधवच्या जागी जडेजाला विचारात घेतलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. इंग्लंडने पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागिदारी केली. तेव्हा जडेजाची गोलंदाजी उपयुक्त ठरली असती असंही सचिन म्हणाला. केदार जाधव सध्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. त्याच्या जागी रविंद्र जडेजा फलंदाजीसुद्धा करू शकतो. तो अष्टपैलू खेळाडू असून चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वासही सचिनने व्यक्त केला.

भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या धावसंख्येत हातभार लावला. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीवर 160 धावा इंग्लंडने कुटल्या. यावेळी केदार जाधवला गोलंदाजीसुद्धा दिली नाही. केदार जाधव फलंदाज म्हणून अपयशी ठरला आहे. त्याच्या जागी इतर खेळाडूंना संधी देता येईल अशी चर्चा होत आहे.

Loading...

World Cup : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत!

'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद

World Cup : सेमीफायनलचा गुंता वाढला, भारतही होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर

VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...