World Cup : वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करताच सचिननं केली 'ही' मोठी भविष्यवाणी

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता कॉमेंट्री करणाऱ्या सचिननं सांगितले चार आवडते संघ.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 09:23 PM IST

World Cup : वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करताच सचिननं केली 'ही' मोठी भविष्यवाणी

क्रिकेटचे चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण म्हणजे वर्ल्डकपचा पहिला सामना नाही तर सचिन तेंडुलकरचे पदार्पण. सचिननं यंदाच्या विश्वचषकात समालोचक म्हणून पदार्पण केले. दरम्यान यावेळी तो विरेंद्र सहवाग आणि सौरव गांगुली यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स आणि मैदानावर दिसला.

दरम्यान आपल्या पदार्पणातच सचिननं मोठी भविष्यवाणी केली. त्यानं यंदाच्या विश्वचषका कोणते चार संघ सेमीफायनपर्यंत मजल मारतील ते सांगितले. दरम्यान आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सामना होत आहे.

सचिननं आपल्या कॉमेंट्री दरम्यान आपला पहिला आवडता संघ विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ असल्याचे सांगितले. न्युझीलंड विरुद्धचा सराव सामना भारतानं गमावला. मात्र बांगलादेश विरोधात राहुल आणि धोनी यांची चांगली फलंदाजी केली. त्यामुळं भारताची गोलंदाजी आणि फलंदाजी संतुलित असल्यामुळं ते सेमीफायनलपर्यंत पोहचू शकतात.

Loading...

तर, सचिनच्या मते दुसरा सेमीफायनला संघ हा यजमान इंग्लड असू शकतो. इंग्लंडच्या संघानं आतापर्यंत एकदाही विश्वचषकाचे विजेतेपद मिळवलेले नाही. मात्र घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळं ते नक्की सेमीफायनलपर्यंत पोहचतील, असे मत सचिननं व्यक्त केले.

सचिनच्या मते चोकर्स म्हणून नावाजलेला साऊथ आफ्रिकेचा संघही सेमीफायनपर्यंत मजल मारु शकतो, असे मत व्यक्त केले. साऊथ आफ्रिकेनेही एकदाही विश्वचषकाते विजेतेपद मिळवलेले नाही.

सचिनच्या मते चोकर्सम्हणून नावजलेला साऊथ आफ्रिकेचा संघही सेमीफायनपर्यंत मजल मारु शकतो, असे मत व्यक्त केले. साऊथ आफ्रिकेनेही एकदाही विश्वचषकाते विजेतेपद मिळवलेले नाही.

भारत, इंग्लंड यानंतर न्युझीलंडचा संघ सेमीफायनलपर्यंत पोहचू शकतो. न्युझीलंडला एकदाही फायनलपर्यंत मजल मारता आलेली नाही. मात्र त्यांचा संघ संतुलित असल्यामुळं याचा त्यांना फायदा होऊ शकतो. असे मत सचिननं व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...