'रेस-4'मध्ये दिसणार टीम इंडियातला भाईजान? रोहितने शेअर केला VIDEO

भारतीय क्रिकेट संघात सलमान भाई अशी ओळख असलेल्या खेळाडूला रेस 4 ची ऑफर?

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 12:03 PM IST

'रेस-4'मध्ये दिसणार टीम इंडियातला भाईजान? रोहितने शेअर केला VIDEO

लंडन, 27 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. भारताला पहिल्याच सराव सामन्यात पराभवाचा दणका बसला. न्यूझीलंडने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच आपली ताकद दाखवून दिली आहे. दुसऱ्या सराव सामन्यासाठी भारतीय संघ लंडनहून कार्डिफला पोहचली आहे.

प्रवास करत असताना खेळाडू फोटो, व्हिडीओ शूट करतात. रोहित शर्माने असताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने रविंद्र जडेजा आणि केदार जाधव यांच्याशी चर्चा केली आहे. जडेजाला त्याने फलंदाजीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावर जडेजाने रोहितचं आभारही मानलं. यावर जडेजाने म्हटलं की, मला आशा आहे की वर्ल्ड कप स्पर्धेतही अशीच कामगिरी पुढे बघायला मिळेल. यावर रोहित म्हणाला की, नक्कीच कारण हा वर्ल्ड कप सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.

रोहितने यावेळी जडेजासोबत केदार जाधवशी चर्चा केली. केदार जाधव रेस 4 चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसेल असंही रोहित म्हणाला. यावर केदार जाधवनेही हो, चर्चा सुरु आहे पाहूया म्हणत रोहितला उत्तर दिलं.Loading...

केदार जाधवला संघात सलमान भाई म्हणून हाक मारली जाते. त्यामुळे नेहमीच त्याला सलमानबाबत काही प्रश्न विचारले जातात. दुखापतीमुळे केदार जाधवला आयपीएल मधेच सोडावं लागलं होतं. दुखापतीतून सावरल्यानंतर तो संघासोबत वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना झाला आहे.


SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...