पाकिस्तानने उद्ध्वस्त केलं होतं हिटमॅनचं जग्गजेतेपदाचं स्वप्न

पाकिस्तानने उद्ध्वस्त केलं होतं हिटमॅनचं जग्गजेतेपदाचं स्वप्न

30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा 13 वर्षांपूर्वी तुटलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरेल.

  • Share this:

मुंबई, 17 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 30 मे पासून सुरुवात होणार आहे. तिसऱ्यांदा जग्गजेता होण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा 13 वर्षांपूर्वी तुटलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरेल. हिटमॅनचं जगज्जेता होण्याचं स्वप्न 2006 मध्ये तुटलं होतं.

तेरा वर्षांपूर्वी 2006 मध्ये वर्ल्ड कप? त्यावेळी तर रोहित शर्मा भारतीय संघातही नव्हता. इतकंच काय 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघातही त्याची निवड झाली नव्हती. तो 2007 च्या टी20 वर्ल्ड कप संघात होता. तरीही त्याचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न कसं तुटलं हाच प्रश्न पडला असेल ना? जाणून घ्या...

रोहित शर्माचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न कसं आणि कधी भंगलं हे माहिती करून घेण्यासाठी इतिहासात जावं लागेल. तेरा वर्षांपूर्वी श्रीलंकेतील कोलंबो येथे 19 फेब्रुवारी 2006 ला एक सामना झाला. त्याची आठवण काढावी असं रोहित शर्माला कधीच वाटणार नाही. कारण या सामन्यात मिळालेला पराभव हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून होता. या पराभवाची सल रोहित शर्माच्या मनात कायम राहिल.

कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर हा वर्ल्ड कप फायनलचा सामना झाला होता. गोलंदाजांसाठी उपयुक्त अशा मैदानावर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची पहिली विकेट 24 धावांवर पडली होती. त्यांच्या संपूर्ण संघाला 41.1 षटकांत सर्वबाद 109 धावा करता आल्या होत्या. भारताकडू पीयूष चावलाने 8 धावांत 4 गडी बाद केले होते.

फायनल सामना आणि प्रतिस्पर्धी संघाने दिलेलं फक्त 109 धावांच आव्हान यामुळे भारत सहज जिंकेल असा अंदाज लावला जात होता. मात्र, भारतीय खेळाडूंच्या स्वप्नांवर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पानी फेरलं. सलामीवीर चेतेश्वर पुजारा शून्यावर तर रोहित शर्मा चार धावांवर बाद झाले. त्यानंतर रविंद्र जडेजाने सहा धावा केल्या. तर गोलंदाजीत कमाल करणाऱ्या पीयुष चावलाने भारताकडून सर्वाधिक 25 धावा केल्या. मात्र, त्या धावाही अपुऱ्या पडल्या. भारतीय संघ 18.5 षटकांत 71 धावांत गुंडाळला होता. आणि पाकिस्तानने 38 धावांनी सामन्यासह वर्ल्ड कप जिंकला होता. हा वर्ल्ड कप अंडर 19 चा होता.

2006 नंतर भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008 चा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी रविंद्र ज़डेजा आणि मनिष पांडे हे दोघेही त्या संघात होते. इंग्लंडमध्ये 30 मे पासून आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहेत. भारतीय संघ 22 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. यंदा भारताला वर्ल्ड कप विजेतेपदाचा दावेदार मानलं जात आहे.

PHOTOS : सुपर मॉडेल्सपेक्षा कमी नाहीत 'या' क्रिकेटपटूंच्या पत्नी

वैतागलेल्या महिलेनं चपलेनं पतीला धू-धू धुतलं, VIDEO व्हायरल

First published: May 17, 2019, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading