World Cup 2019 : भारताविरुद्ध दिग्गजांना जमलं नव्हतं ते मुजीबनं केलं!

ICC Cricket World Cup 2019 : अफगाणिस्तानचा गोलंदाज मुजीब उर रहमानने भारताचा सलामीवीर रोहित शर्माला बोल्ड केलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 06:09 PM IST

World Cup 2019 : भारताविरुद्ध दिग्गजांना जमलं नव्हतं ते मुजीबनं केलं!

साऊथॅम्पटन, 22 जून : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज मुजीब उर रहमनानने भारताचा सलामीवीर रोहित शर्माला क्लिन बोल्ड केलं. यासह त्याने एक अनोखी कामगिरी नावावर केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत एकाही फिरकीपटूने भारतीय फलंदाजाला बाद केलं नव्हतं. रोहितला बाद करून मुजीबने ही कामगिरी केली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फटकेबाजीची संधीच दिली नाही. 12 ते 19 षटकांत भारताच्या फलंदाजांना एकही चौकार मारता आला नाही. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा केवळ एका धावेवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल 30 धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि राहुल यांच्यात अर्धशतकी भागिदारी झाली होती. केएल राहुल बाद झाल्यावर विराट कोहलीनं 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर विराट कोहलीने विजय शंकरला साथीला घेत अर्धशतकी भागिदारी केली. विजय शंकर 30 धावांवर बाद झाला, त्यानंतर विराट कोहलीसुद्धा 67 धावांवर बाद झाला.

अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. सध्या महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव फलंदाजी करत आहेत. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. तर, अफगाणिस्ताननं आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळं त्याचे आव्हान वर्ल्ड कपमध्ये संपुष्टात आले आहे. तरी, भारताविरुद्ध चांगली खेळी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवत भारतीय संघ गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचू शकतो.

Loading...

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

वाचा- विराटचा डोळा सचिन आणि लाराच्या विश्वविक्रमावर; अफगाणविरुद्ध आहे संधी!

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...