World Cup : रिषभ पंत इंग्लंडमध्ये पोहचला, BCCIने दिली खूशखबर!

World Cup : रिषभ पंत इंग्लंडमध्ये पोहचला, BCCIने दिली खूशखबर!

ICC Cricket World Cup ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने रिषभ पंतला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंडला बोलावलं आहे.

  • Share this:

लंडन, 15 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे किमान दोन आठवडे त्याला खेळता येणार नाही. आता त्याच्या ऐवजी संघात कोण खेळणार असा प्रश्न भारतासमोर आहे. धवनच्याजागी रिषभ पंतला संघात स्थान मिळेल. त्याला इंग्लंडमध्ये बोलवून घेतलं असलं तरी शिखर धवनबाबत दोन आठवड्यांनी निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, इंग्लडंमध्ये पोहचलेल्या रिषभ पंतचा मॅंचेस्टर मैदानावरील फोटो बीसीसीआयने शेअर केला आहे. पाहा कोण आलंय इथं असाच काहीसा कॅप्शन त्यांनी फोटोला दिला आहे. मँचेस्टरवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सराव करत आहे. या सरावातही रिषभ पंतने भाग घेतला.

सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने किमान दोन आठवडे तो खेळू शकणार नाही. त्यामुळे भारतीय संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला घ्यायचं आणि पुन्हा चौथ्या क्रमांकावर कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित शर्मासोबत सलामीला केएल राहुल मैदानात उतरण्याची शक्यता आहे. रोहितने एक शतक झळकावलं असून सध्या केएल राहुलसुद्धा फॉर्ममध्ये आहे.

भारतासमोर पुन्हा चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न उभा राहिला आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. तर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास दिनेश कार्तिक किंवा विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते.मधल्या फळीत महेंद्रसिंग धोनी आणि हार्दीक पांड्या अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. तर केदार जाधव सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. ओल्ड ट्रॅफर्डवर वेगवान गोलांदाजांना अनुकुल खेळपट्टी असल्याने संघात युझवेंद्र चहलला सामिल करून कुलदीप यादवला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

India Vs Pakistan : काळाबाजार तेजीत, एका तिकीटाची 'इतकी' किंमत!

World Cup : भारताविरुद्ध पाकिस्तानचा खेळाडू वापरणार 'विराट'अस्त्र

World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!

SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'अ‍ॅडवॉर'

First published: June 15, 2019, 5:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading