World Cup जिंकण्याचं भारताचं स्वप्न 'या' कारणांनी भंगलं!

ICC Cricket World Cup स्पर्धेत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या भारताला न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2019 07:45 PM IST

World Cup जिंकण्याचं भारताचं स्वप्न 'या' कारणांनी भंगलं!

मँचेस्टर, 10 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये भारताला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड़कडून पराभव पत्करावा लागला. तिसऱ्यांदा विजेतेपद पटकवण्याचं भारताचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. जडेजा आणि धोनीने विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र, जडेजा झेलबाद झाल्यानंतर धोनी धावबाद झाला आणि तिथंच भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. भारताचा डाव 221 धावांत संपुष्टात आला.

न्यूझीलंडविरुद्ध भारताने पहिल्याच चेंडूवर चूक केली. न्यूझीलंड फलंदाजीला असताना डीआरएस घेतला. यात मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राहिला. यामुळं भारतानं एक डीआरएस गमावला.

भारताकडून न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरला जीवदान मिळालं. रॉस टेलर 19 धावांवर खेळत असताना धोनीने त्याचा झेल सोडला. त्यानंतर रॉस टेलरनं 74 धावा केल्या. न्यूझीलंडकडून या सर्वाधिक धावा होत्या.

दरम्यान यात सर्वात मोठा फटका भारताला पावसामुळे बसला. पावसानंतर खेळपट्टीवर गोलंदाजांना अधिक मदत मिळाली. पहिल्या दिवशी सामना थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचे तीन गडी बाद केले. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताचा निम्मा संघ 71 धावांत तंबूत परतला.

वर्ल्ड कपमध्ये एकामागोमाग विक्रम रचणारे भारताचे आघाडीचे फलंदाज अखेरच्या सामन्यात मात्र अपयशी ठरले. रोहित शर्मा, कोहली आणि केएल राहुल प्रत्येकी एक धाव काढू शकले.

Loading...

भारताची भीस्त आघाडीच्या फलंदाजीवरच होती. संपूर्ण स्पर्धेत भारताचे आघाडीचे फलंदाज तंबूत गेल्यानंतर इतर फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत.

सेमीफायनलमध्ये भारताचे मधल्या फळीतील फलंदाज पंत, पांड्या चुकीचे फटके खेळून बाद झाले. ऋषभ पंतने 56 चेंडूत 32 धावांची खेळी केली. त्यानंतर पांड्याही बाद झाला. सावध खेळीची गरज असताना त्यांची ही चूक महागात पडली.

भारताने मोठी चूक केली ती सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या जागी दिनेश कार्तिकला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. धोनीला दबावात खेळण्याचा अनुभव आहे. कोणत्या प्रकारे कशा पद्धतीनं खेळायचं हे त्याला चांगलं माहिती आहे तरीही त्याला फलंदाजीला उशिरा उतरवलं. धोनी वरती फलंदाजीला आला असता तर भारताला विजयाची संधी मिळाली असती.

भारताने सेमीफायनलमध्ये कुलदीप यादवच्या जागी चहलला संघात घेतलं. भारताकडे केदार जाधवसारखा पर्याय असतानाही दिनेश कार्तिकला संघात ठेवलं. कार्तिकला संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्या तुलनेत केदार जाधव कधीही योग्य पर्याय ठरला असता.

धोनी आणि जडेजा मैदानात होते तोपर्यंत भारताच्या विजयाच्या आशा कायं होत्या. मात्र जडेजा झेलबाद झाल्यानंतर सर्व भीस्त धोनीवर होती. दोन धावा घेण्याच्या नादात तो गुप्टिलच्या थेट फेकीवर धावबाद झाला आणि भारताच्या सर्व आशा संपुष्टात आल्या.

SPECIAL REPORT : भक्तांची अलोट गर्दी जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...