World Cup : असाही नंबर 'वन'! राशिदच्या कारकिर्दीतला सर्वात वाईट सामना

जगातील नंबर एकचा फिरकीपटू असलेल्या राशिद खानचं आतापर्यंतचं रेकॉर्ड पाहता इंग्लंडने केलेली धुलाई तो कधीच विसरणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 06:53 AM IST

World Cup : असाही नंबर 'वन'! राशिदच्या कारकिर्दीतला सर्वात वाईट सामना

मँचेस्टर, 18 जून : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्या सामन्यात पाऊस पडला पण तो षटकारांचा पडला. इंग्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध 50 षटकात 397 धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने 17 षटकारांसह 71 चेंडूत 148 धावा केल्या. मॉर्गनच्या वादळात सर्वात जास्त वाताहत झाली ती जगातील नंबर एकचा फिरकीपटू राशिद खानची. त्याच्या 9 षटकात 110 धावा कुटल्या. त्याच्या 9 षटकात तब्बल 11 षटकार खेचले. राशिद खान वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या मायकल स्नेडनने 1983 मध्ये 12 षटकांत 105 धावा दिल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये जेसन होल्डरने 104 तर दौलत झारदानने 101 धावा दिल्या होत्या.

(वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही')

राशिद खान जगातील पहिला फिरकीपटू ठरला ज्याने 100 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. नको असलेला विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. राशिदला आणखी एक षटक दिलं असतं तर सर्वात जास्त धावा देणारा गोलंदाज ठरला असता. सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मायकल लुईसच्या नावावर आहे. त्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकात 113 धावांची खैरात केली होती.

(वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट)

राशिद खानच्या गोलंदाजीवर इंग्लंडने 11 षटकार खेचले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतके षटकार कोणत्याच गोलंदाजाला मारले नव्हते. राशिदच्या गोलंदाजीवर मारलेल्या 11 षटकारांपैकी 7 षटकार इयॉन मॉर्गननेच मारले होते. एका फलंदाजाने इतके षटकार एका गोलंदाजाला मारण्याचीसुद्धा पहिलीच वेळ आहे. राशिदने या सामन्याच्या आधी कोणत्याही सामन्यात दोनपेक्षा जास्त षटकार दिले नव्हते. राशिदच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना ठरला.

Loading...

लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 06:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...