VIDEO : कुणी असं बाद होऊ नये, आफ्रिकेच्या सलामीवीरांचा गोंधळ

VIDEO : कुणी असं बाद होऊ नये, आफ्रिकेच्या सलामीवीरांचा गोंधळ

बांगलादेशनं दिलेल्या 331 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक धावबाद झाला.

  • Share this:

ओव्हल, 02 जून : बांगलादेशनं दिलेल्या 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या 50 धावा होण्याआधीच पहिला धक्का बसला. एकेरी धाव घेण्याच्या नादात क्विंटन डी कॉक धावबाद झाला. त्याने 32 चेंडूत 23 धावा केल्या. 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. डी कॉक बाद झाला तेव्हा आफ्रिकेच्या 9.4 षटकांत 1 बाद 49 धावा झाल्या होत्या.

दहाव्या षटकात मेहीदी हसनच्या गोलंदाजीवर डीकॉकने मारलेला चेंडू रहिमच्या दिशेने गेला. त्यावेळी नॉन स्ट्राइकला असलेला मार्करम धावत पुढे आला होता. त्याला डीकॉकने थांबण्याचा इशारा केला पण तो धावत पुढे आला. त्यानंतर पुन्हा मार्करम थांबला आणि डीकॉक मागे वळला. दरम्यान रहिमने या दोघांच्या गडबडीत थेट थ्रो मारला आणि डी कॉक धावबाद झाला.

तत्पूर्वी,दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. दक्षिण आफ्रिकेला हा निर्णय महागात पडला. बांगलादेशच्या फलंदाजांनी निर्धारीत 50 षटकांत 6 बाद 330 धावा केल्या. सलामीची जोडी 75 धावा करून तंबूत परतली. तमीम इक्बाल 16 तर सौम्या सरकार 42 धावांवर बाद झाल्यानंतर शाकिब आणि मुश्फीकर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.

शाकिब अल हसन आणि मुश्फीकर रहिम यांनी 142 धावांची भागिदारी केली. शाकिबने 75 तर मुश्फीकरने 78 धावा केल्या. मोहम्मद मिथून 21 धावा करून बाद झाला. मोहम्मदुल्लाह आणि मोसद्दक हुसैन दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत संघाला 300 च्या पार पोहचवलं. आफ्रिकेकडून इम्रान ताहिर आणि एंडिले फेहुलक्वायो यांनी प्रत्येकी दोन तर ख्रिस मोरिसने एक गडी बाद केला.

VIDEO: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, टॅक्सीचं भाडं वाढणार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 2, 2019, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading