World Cup सेमीफायनल गाठतील हे 4 संघ, बांगलादेश ठरू शकतो जायंट किलर!

World Cup सेमीफायनल गाठतील हे 4 संघ, बांगलादेश ठरू शकतो जायंट किलर!

ICC Cricket World Cup मधील निम्मे सामने झाले असून दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

  • Share this:

लंडन, 20 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेतील जवळपास निम्मे सामने झाले आहेत. कोणते संघ सेमीफायनलला पोहचतील याचं चित्र स्पष्ट होत आहे. न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना वर्ल्ड कपमधील 25 वा सामना होता. यातील पराभवाने दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर कोणते चार संघ पोहचतील याचा अंदाज लावणं सोपं झालं आहे. सध्या गुणतक्त्यात 9 गुणांसह न्यूझीलंड अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानावर इंग्लंड आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर असून बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यास ते पहिल्या दोन मध्ये जागा मिळवतील. चौथ्या क्रमांकावर भारत आहे. हे चार संघ सेमिफायनलला जागा पक्की करतील असं दिसत आहे.

भारताशिवाय इतर सर्व संघांचे पाचपेक्षा जास्त सामने झाले आहेत. भारताने चार सामने तर आफ्रिकेनं 6 सामने खेळले आहेत. अफगाणिस्तानचा पाचही सामन्यात पराभव झाला आहेत. तर पाकिस्तानने 5 सामन्यात 3 गुण आणि दक्षिण आफ्रिकेचे 6 सामन्यात 3 गुण झाले असून त्यांची पुढची वाटचाल कठीण आहे.

अफगाणिस्तानचे पुढचे सामने भारत, बांगलादेश, पाकिस्तान, वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध आहेत. पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध लढायचे आहे. तर दक्षिण आफ्रिकेला पाक, लंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.

वेस्ट इंडिजचे 5 सामन्यात 3 गुण, लंकेचे 5 सामन्यात 4 गुण झाले आहेत. या संघांनाही वर्ल्ड कपमध्ये आव्हान जिवंत ठेवणं कठीण आहे. वेस्ट इंडिजचे पुढचे सामने न्यूझीलंड, भारत, अफगाणिस्तान आणि लंकेविरुद्ध आहेत.

सध्या बांगलादेशची कामगिरी पाहता हा संघ जायंट किलर ठरू शकतो. त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत करून आपली ताकद दाखवली आहे. बांगलादेशने पाचपैकी दोन सामने जिंकले तर दोन मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचे उर्वरित सामने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. यात ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध त्यांचा पराभव झाला आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानला पराभूत केलं तर त्यांना सेमिफायनल गाठता येणार नाही. चारपैकी तीन सामने जिंकल्यास त्यांना संधी मिळू शकते. मात्र, धावगती कमी असल्याने त्यांना 'जर.. तर'च्या खेळावर अवसंबून रहावं लागेल.

वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनला, पण ती प्रियकरासोबत पळाली

First published: June 20, 2019, 8:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading