World Cup : इंग्लंडचा पराभवाने पाकचा फायदा, दुसऱ्यांदा जग्गजेते होणार?

World Cup : इंग्लंडचा पराभवाने पाकचा फायदा, दुसऱ्यांदा जग्गजेते होणार?

ICC Cricket World Cup : पाकिस्तानने 1992 ला वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी जशी परिस्थिती होती अगदी तशीच आताही आहे.

  • Share this:

लंडन, 25 जून : ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंड सहज सेमिफायनल गाठेल असं चित्र स्पर्धेतील निम्मे सामने होईपर्यंत होतं. मात्र, साखळी फेरीतील शेवटच्या टप्प्यात बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानने मिळवलेला विजय आणि इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव यामुळे त्यांना पुढची वाटचाल कठीण होणार असंच दिसत आहे. इंग्लंडचे उर्वरित दोन सामने न्यूझीलंड आणि भारतासोबत होणार आहेत. यात त्यांना विजय मिळवणं मोठं आव्हान असणार आहे. जर सेमिफायनल गाठायची असेल तर दोन्ही बलाढ्य संघांना पराभूत करणं गरजेचं आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या पराभवाने पाकिस्तानच्या सेमिफायनलला पोहचण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

पाकिस्तानने 1992 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी जशी परिस्थिती होती अगदी तशीच आताही आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पाकिस्तानची त्यावेळी सुरुवातीच्या सामन्यात पराभव, पावसाने सामना रद्द आणि पुन्हा विजय अशीच वाटचाल होती. शेवटच्या टप्प्यात त्यांनी कामगिरीत सुधारणा करत वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंतचे रेकॉर्ड आणि 1992 चे रेकॉर्ड यात काही फरक नाही. पाकिस्तानचे आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 6 सामने झाले आहेत. यातील त्यांचा निकाल हा 1992 च्या पहिल्या 6 सामन्यांप्रमाणेच आहे. पुढची परिस्थिती त्यांना अनुकूल राहिली तर ते सेमिफायनलला पोहचू शकतात. सध्या इंग्लंड चौथ्या क्रमांकावर असून त्यांचे पुढचे सामने बलाढ्य संघासोबत असणार आहेत. तर पहिले तीन संघ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत यांचे सेमिफायनलमधील स्थान जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पाकच्या पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव झाला होता. त्यानंतर दुसरा सामना जिंकला होता तर तिसरा सामना होऊ शकला नव्हता. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सहावा सामना जिंकला होता. 2015 च्या वर्ल्ड कपमध्येसुद्धा त्यांची अशीच परिस्थिती आहे.

पाकिस्तानने 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये सहाव्या सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा आमिर सोहेल सामनावीर ठरला होता. त्यानंतर आता 2019 मध्ये सहाव्या सामन्यात पाकिस्तानने 49 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हॅरिस सोहेलला सामनावीर मिळाला होता.

दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पाकचे 6 सामन्यात 5 गुण झाले आहेत. जर पाकिस्तानने पुढचे तीनही सामने जिंकले तर त्यांना सेमिफायनलला जागा मिळू शकते. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. पाकिस्तानच्या वर लंकेचा संघ असून ते एका सामन्यात जरी पराभूत झाले आणि इतर सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 10 गुण होतील. तर बांगलादेशसुद्धा एका सामन्यात पराभूत झाल्यास त्यांनाही 10 गुण मिळवता येतील. या दोन्ही संघांना भारताशी लढायचे आहे. त्यात विजय मिळवणं लंकेला आणि बांगलादेशला कठीण आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानने मिळवलेल्या विजयानंतर त्यांचे मनोबल उंचावले आहे. भारताविरुद्ध दिसलेला पाकिस्तानचा संघ आणि आफ्रिकेविरुद्ध खेळलेला संघ यात बराच फरक दिसला. पाकिस्तानने उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर येऊ शकतात. अर्थात ते सेमिफायनलला पोहचले तरी तिथं त्यांना बलाढ्य संघांशी लढावे लागेल. सेमिफायनलमध्ये पाकिस्तानची कामगिरी कमी पडू शकते.क्षेत्ररक्षणात सर्वात ढिसाळ कामगिरी करण्याचा पराक्रम त्यांच्याच नावावर आहे.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 26, 2019, 8:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading