लंडन, 15 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत इंग्लंडने तिसरा विजय मिळवला. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला. जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या भेदक गोंलदाजीसमोर वेस्ट इंडिजला 212 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दोन गड्याच्या मोबदल्यात 213 धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो 45 धावा करून बाद झाला. त्याने जो रूटसोबत 95 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रूटने वोक्ससोबत 104 धावांची भागिदारी केली. वोक्स उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर रूटने यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसऱे शतक साजरं करताना संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिज यांच्यात धावांचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, वेस्ट इंडिजला इंग्लंडने 212 धावांत गुंडाळले. सलामीवीर ख्रिस गेलला फक्त 36 धावा करता आल्या. त्यानंतर निकोलस पूरनने अर्धशतकी खेळी केली. पूरनला जोफ्रा आर्चरने जोस बटलरकरवी झेलबाद केलं. त्याने 63 धावा केल्या. गेल आणि पूरनशिवाय शिम्रॉन हेटमायरने 39 धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी तीन तर जो रूटने 2 गडी बाद केले.
इंग्लंडने गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी पोहचला असून भारताची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघांना एक गुण देण्यात आला. आता भारताचे पाच गुण झाले होते. सध्या पहिल्या क्रमांकावर 7 गुणांसह न्यूझीलंड असून रनरेटच्या जोरावर इंग्लंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.
पाकिस्तानी बशीर चाचाला मिळालं नाही तिकीट, धोनीच्या भरोशावर पोहोचला सामना बघायला!
भारताचे तीन सामने झाले असून पुढचा सामना रविवारी 16 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी शनिवारी श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामने होणार आहेत. यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यास ते पहिल्या स्थानावर पोहचतील तर श्रीलंका जिंकल्यास 6 गुणांसह भारताला मागे टाकून त्यांना चौथ्या स्थानावर पोहचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांनी अद्याप खाते उघडलेलं नाही. दोन्ही संघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.
World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!
SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'अॅडवॉर'