World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

विराटसेना 5 जूनरोजी साऊथ आफ्रिका विरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 07:41 AM IST

World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

लंडन, 04 जून : आयसीसी वर्ल्ड कपला सुरुवात होऊन एक आठवडाही झाला नाही आहे, त्या आधीच धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पाकने यजमानांना धूळ चारत आपला पहिला विजय नोंदवला. असे असले तरी, आयसीसीच्या नवीन नियमांनुसार सर्व संघाना 9 सामने खेळालयचे आहे. सामन्याअंती जे संघ पहिल्या चार क्रमांकावर असतील ते संघ सेमीफायनलपर्यंत पोहचतील. त्यामुळं यंदाच्या विश्वचषकात गुणतालिकेची भुमिका महत्त्वाची असणार आहे.

सध्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तानला धूळ चारत 2 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने एकही सामना न जिंकता पराक्रम केला आहे. भारतीय संघ गुंतालिकेत 0 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. विराटसेना 5 जूनरोजी साऊथ आफ्रिका विरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान, साऊथ आफ्रिका संघाने आपले दोन्ही सामने गमावल्यामुळे सध्या ते आठव्या स्थानावर आहेत. तर अफगाणिस्तान आणि श्रीलंका अनुक्रमे 9व्या आणि 10व्या क्रमांकावर आहेत. साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा रनरेट -1.250च्या खाली असल्यामुळं 0 गुणांसह भारत सातव्या क्रमांकावर आहे.


Loading...


सोमवारी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या हाफिजनं इंग्लंडच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. 85 धावांची तुफानी खेळी करत इंग्लंडसमोर 349 धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणारा संघ म्हणून ओळख असलेल्या यजमानांना हे आव्हान पार करता आले नाही. इंग्लंडकडून जो रूट आणि जोस बटलर यांनी शतकी खेळी केली, मात्र इंग्लंडला सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानने 14 धावांनी विजय मिळवून वर्ल़्डकप आधी झालेल्या मालिकेतील पराभवाचा बदला घेतला. त्यामुळं गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ 6व्या क्रमांकावर आहे तर, इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

वाचा- 'त्या' फोन कॉलमुळे वर्ल्ड चॅम्पियन संघात खेळू शकला सचिन

वाचा-World Cup : बेअरस्टोच्या तडाख्याने बदलला आकार, पंचांना मागवावा लागला नवा चेंडू


VIDEO: धक्कादायक! कुलगाम परिसरात जवानांच्या गाडीर तुफान दगडफेक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 07:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...