World Cup : ...अन् क्रिकेटपटूनं पत्नीला चक्क कपाटात लपवून ठेवलं

वर्ल्ड कप असो किंवा इतर देशांतील दौऱे अनेक क्रिकेटपटू पत्नी किंवा प्रेयसीला सोबत घेऊन जातात.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 12:20 PM IST

World Cup : ...अन् क्रिकेटपटूनं पत्नीला चक्क कपाटात लपवून ठेवलं

इंग्लंडमध्ये 30 मे ते 15 जुलै या कालावधीत क्रिकेट वर्ल्ड कपचा महासंग्राम रंगणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना पत्नी किंवा प्रेयसी यांच्यासोबत राहण्यास परवानगी दिली आहे.

बीसीसीआयनं खेळाडूंना पत्नी किंवा प्रेयसीसोबत राहण्याची परवानगी दिली असली तरी यासाठी अट घातली आहे. फक्त 15 दिवस राहू शकतात. तसेच पहिल्या 21 दिवसांत त्यांना पत्नी किंवा प्रेयसीसोबत राहता येणार नसल्याचंही सांगितलं आहे.

प्रत्येक देशाच्या क्रिकेट बोर्डाकडून हा नियम लावला जातो. त्यात थोडाफार बदल असतो. या नियमाने एक मजेशीर प्रसंग पाकिस्तानच्या खेळाडूसोबत घडला होता.

Loading...

1999 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने सुपर सिक्समध्ये प्रवेश केला होता. यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना पत्नी आणि प्रेयसीला मायदेशी पाठवण्याचा आदेश दिला. या आदेशाचे खेळाडूंनी पालन केले.

पाकिस्तानने फायनलला धडक मारली या कामगिरीने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आनंदी होते. मात्र, अचानक फायनलच्या आदल्या दिवशी संघ व्यवस्थापकांनी खेळाडूंच्या खोलीची तपासणी करण्यास सुरुवात केली.

सकलेन मुश्ताकला हे समजताच तो घामाघूम झाला. कारण त्याची पत्नी त्याच्यासोबत होती. जर हे व्यवस्थापकाला समजलं तर आपल्यावर कारवाई होईल या भीतीने त्याने पत्नीला चक्क कपाटात बंद करून ठेवलं होतं.

संघ व्यवस्थापकांनी सकलेनच्या खोलीत येऊन पाहणी केली आणि निघून गेले. त्यानंतर सकलेनने त्याच्या सहकारी खेळाडूंच्या समोर पत्नीला कपाटातून बाहेर काढलं आणि सुटकेचा निश्वास सोडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...