VIDEO : पाकच्या खेळाडूला भर मैदानात सांगितलं 20 रुपयांचे पकोडे आण

VIDEO : पाकच्या खेळाडूला भर मैदानात सांगितलं 20 रुपयांचे पकोडे आण

ICC Cricket World Cup 2019 : सोशल मीडियावर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदनंतर या खेळाडूची खिल्ली उडवली जात आहे.

  • Share this:

लंडन, 03 जून : वर्ल्ड कपच्या महासंग्रामाची रंगत आता वाढू लागली आहे. बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून इतर संघांना इशाराच दिला आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना सुरु आहे. या सामन्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पाकिस्तानी खेळा़डू फखर जमानची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्या सामन्यावेळचा आहे. या सामन्यात फखर जमान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी एका प्रेक्षकाने आवाज दिला की, फखर भाई 20 रुपयांचे पकोडे घेऊन ये. यानंतर फखरने हसत हात हालवून प्रतिक्रिया दिली.

फखर जमानची खिल्ली उडवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदही ट्रोल झाला होता. महाराणी एलिझाबेथला भेटायला जाताना त्याने परिधान केलेल्या पोशाखावरून ट्रोल करण्यात आलं होतं. यावेळी त्याच्या ड्रेसवरून चर्चा झाली होती.

पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमधील पहिला सामना निराशाजनक असाच ठरला होता. पहिल्या सामन्यात त्यांना 105 धावा करता आल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजने 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. दरम्यान गेल्या 11 सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाला इंग्लंडने वर्ल्ड कपच्या आधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत 4-0 ने पराभूत केले होते.

वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात

वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट

VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'

First published: June 3, 2019, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading