असं काय झालं की, वेस्ट इंडिजसमोर लोटांगण घालणाऱ्या पाकने इंग्लंडवर विजय मिळवला

वेस्ट इंडिजविरुद्ध 105 धावा केलेल्या फलंदाजांनी नंबर एकच्या संघासमोर 349 धावांचा डोंगर उभा केला आणि विजयसुद्धा मिळवला.

  • Share this:

इंग्लंडच्या जो रूट आणि जोस बटलर यांच्या शतकानंतरही पराभवाला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानने दिलेल्या 349 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 334 धावाच करता आल्या.

पाकिस्तानच्या तुलनेत इंग्लंडचा संघ सर्वच बाबतीत कमी पडला. आय़सीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने वर्ल्ड कपच्या आधी झालेल्या मालिकेत इंग्लंडला 4-0 ने पराभूत केलं होतं.

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने 24 व्या षटकात मोहम्मद हाफीजचा सोडलेला झेल महागात पडला. त्यावेळी हाफीज फक्त 11 धावांवर खेळत होता. पाकिस्तानकडून हाफीजने सर्वाधिक 84 धावा केल्या. हा झेल सुटला नसता तर कदाचित सामन्याचं चित्र वेगळं असतं.

जेसन रॉय क्षेत्ररक्षणात  आणि फलंदाजीतही अपयशी ठरला. त्याने दुसऱ्याच षटकात डीआरएस रिव्ह्यूसुद्धा घेतला. त्यातही त्याला अपयश आलं. शादाब खानच्या गोलंदाजीवर तो पायचित होऊन माघारी परतला. त्याने फक्त 8 धावा केल्या.

पाकिस्तानने चुका केल्या तरीही त्यांनी सांघिक कामगिरीत इंग्लंडला या सामन्यात मागं टाकलं. पाकिस्तानच्या फलंदाजांसह सर्व गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. हसन अली वगळता प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेतली आहे. वहाब रियाझने 3 तर मोहम्मद आमिर, शादाब खानने 2 तर मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिकने एक विकेट घेतली.

इंग्लंडच्या ख्रिस वोक्स आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. मोईन अली आणि मार्क वूड (2 विकेट) यांनी कमी धावा दिल्या. तर ख्रिस वोक्सने 8 षटकांत 72 धावा दिल्या. जोफ्रा आर्चरची गोलंदाजी पाकिस्तानविरुद्ध काही कमाल करू शकली नाही. त्याच्या गोलंदाजीवर 10 षटकांत 79 धावा पाकिस्तानने काढल्या.

पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके केली. पाकिस्तानच्या फलंदाजांना  वेस्ट इंडिजविरुद्ध बाऊन्सर्सनी जेरीला आणलं होतं. ती चूक सुधारून त्यांनी या सामन्यात पुनरागमन केलं. वेस्ट इंडिजसमोर 105 धावांत लोटांगण घालणाऱ्या संघाने आज इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभा केला.

इंग्लंडविरुद्ध ख्रिस वेक्स, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांच्या माऱ्यासमोर खेळण्यासाठी बाऊन्सरवर जास्त सराव करून पाकने इंग्लंडला लोळवलं. त्यांना पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी दिलेले डोस कामी आले असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 11:53 PM IST

ताज्या बातम्या