News18 Lokmat

सत्य कटू असतं, पाकच्या खेळाडूने केला असा निषेध

वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी अशा प्रकारे ट्विट केल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 10:55 AM IST

सत्य कटू असतं, पाकच्या खेळाडूने केला असा निषेध

नवी दिल्ली, 21 मे : इंग्लंड विरुद्ध पाक यांच्यातील मालिकेत पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला. त्यानंतर पाकिस्तानने आपल्या वर्ल्ड कपच्या संघात तीन बदल केले. या बदलानंतर वेगवान गोलंदाज जुनैद खानने निषेध व्यक्त केला आहे.

जुनैद खानला वर्ल्ड कपच्या संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी मोहम्मद आमिरला स्थान देण्यात आलं. जुनैद वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची दाट शक्यता होती. मात्र आता निवड अधिकाऱ्यांनी असिफ अली आणि मोहम्मद आमिरला संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेतील खराब कामगिरीच्या आधारावर जुनैदला वगळण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या संघातून वगळल्यानंतर नाराज झालेल्या जुनैदने ट्विटरवरून निषेध नोंदवला आहे. त्याने तोंडावर काळी पट्टी चिटकवलेला फोटो पोस्ट केला आहे. मी काही बोलू इच्छित नाही. सत्य कटू असतं असं कॅप्शन जुनैदने दिलं आहे. त्याच्या या पोस्टने संघातील वातावरण बिघडल्याचंच दिसून येतं. जुनैदने त्याची ही पोस्ट नंतर डीलिट केली.Loading...

इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा 4-0 असा पराभव झाला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी दिलेल्या मोठ्या आव्हानानंतर गोलंदाज इंग्लंडला रोखण्यात कमी पडले. मोहम्मद आमिर शिवाय वहाब रियाजला संघात स्थान देण्यात आलं आहे. हे दोन्ही गोलंदाज पहिल्यांदा घोषित करण्यात आलेल्या संघात नव्हते.


भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2019 10:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...