ENGvPAK : आफ्रिकेचा फॉर्म्युला, सर्फराजने केली इंग्लंडची मोठी शिकार

ICC Cricket World Cup 2019 पाकिस्तानने दिलेल्या 349 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या 10 षटकांत 2 बाद 62 धावा झाल्या.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 08:13 PM IST

ENGvPAK : आफ्रिकेचा फॉर्म्युला, सर्फराजने केली इंग्लंडची मोठी शिकार

नॉटिंगहम, 03 जून : वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध 348 धावा केल्या. फलंदांजांच्या कामगिरीनंतर गोलंदाजीला मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने इंग्लंडला दुसऱ्याच षटकात धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या सामन्यात वापरलेला फॉर्म्युला पाकचा कर्णधार सर्फराज अहमदनं या सामन्यात वापरला.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीसनं पहिल्याच सामन्यात फिरकीपटू इम्रान ताहिरच्या हाती पहिलं षटक टाकण्यासाठी चेंडू सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत इम्रानने दुसऱ्याच चेंडूवर बेअरस्टोला क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केलं. इंग्लंडविरुद्ध पाकचा कर्णधार सर्फराजने हीच पद्धत पुन्हा अवलंबली.

पाकने दिलेल्या 349 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडविरुद्ध दुसऱं षटक टाकण्यासाठी फिरकीपटू शादाब खानच्या हाती चेंडू दिला. त्याने पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला पायचित केलं. यावेळी रॉयने डीआरएससुद्धा घेतला. त्यात रॉय बाद असल्याचं दिसलं. जेसन रॉयने फक्त 8 धावा केल्या. क्षेत्ररक्षण करताना त्याने 24 व्या षटकात मोहम्मद हाफिजचा झेल सोडला.

तत्पूर्वी, वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 348 धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 14 षटकांत 82 धावा केल्या. त्यानतंर 15 व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीव फखर जमान यष्टीचित झाला. त्याने 40 चेंडूत 36 धावा केल्या. त्यानंतर 21 व्या षटकात मोईन अलीनेच इमाम उल हकला बाद केलं. इमामने 58 चेंडूत 44 धावा केल्या.

पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी 88 धावांची भागिदारी केली. या दोघांची जोडी मोईन अलीने फोडली. बाबर आझम 66 चेंडूत 63 धावा काढून बाद झाला. त्यावेळी संघाच्या 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बाबर बाद झाल्यानंतर हाफीज आणि कर्णधार सर्फराज अहमदने 80 धावांची भागिदारी केली. मोहम्मद हाफीजला बाद करून मार्क वूडने पाकिस्तानला चौथा धक्का दिला. हाफीजने 84 धावा केल्या. 46 व्या षटकात पाकिस्तानच्या 300 धावा झाल्या. कर्णधार सर्फराज अहमदने 43 चेंडूत 55 धावांची वेगवान खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

Loading...

वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात

वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट


VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...