बाप मैदानावर खेळत असताना मुलीने घेतला अखेरचा श्वास

मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असताना तो मैदानावर संघर्ष करत होता.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 12:33 PM IST

बाप मैदानावर खेळत असताना मुलीने घेतला अखेरचा श्वास

नॉटिंगहम, 20 मे : वर्ल्ड कपच्या इंग्लंडने पाकिस्तानला एकदिवसीय मालिकेत 4-0 ने पराभूत करून विजय मिळवला. दरम्यान, शेवटचा सामना सुरु असताना पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज असिफ अलीच्या मुलीचा अमेरिकेत मृत्यू झाला. असिफ अलीच्या मुलीवर रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरु होते. तिच्या मृत्यूची माहिती इस्लामाबाद युनायटेडनं दिली आहे.

पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात असिफ अलीचा समावेश नाही. शेवटचा एकदिवसीय सामना झाल्यानंतर तो अमेरिकेला जाण्यासाठी परतणार रवाना झाला आहे. शेवटच्या सामन्यात त्याने 22 धावा केल्या. मात्र, हा सामना इंग्लंडने 54 धावांनी जिंकला.

असिफ अलीने आतापर्यंत 16 एकदिवसीय सामन्यात 342 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने चार सामन्यात दोन अर्धशतकांसह 142 धावा केल्या.इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने 4-0 ने विजय साजरा केला. मालिकेतील पाचवा सामना 54 धावांनी जिंकला. या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मालिकेत धावांचाही पाऊस पडला.

वाचा : World Cup : 175 धावांच्या खेळीने बदललं भारतीय क्रिकेटचं भवितव्य

पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 4 सामन्यात इंग्लंडने 373, 359, 341 आणि 351 धावा केल्या. सलग 4 सामन्यात 340 पेक्षा जास्त धावा करणारा इंग्लंड हा जगातील पहिला संघ आहे.


VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...