'भाईजान, सबको बैटिंग मिलेगी', पाकिस्तानची खिल्ली उडवणारी मीम्स व्हायरल

icc cricket world cup 2019 वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज 105 धावा करू शकले. यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवणारी मीम्स व्हायरल झाली.

  • Share this:

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकची वेस्ट इंडिजच्या माऱ्यासमोर दाणादाण उडाली. पाकिस्तानला सर्वबाद 105 धावा करता आल्या.

सर्व फलंदाज एका पाठोपाठ बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी लगेच पाकिस्तानची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. गोलंदाजांना ते आमची विकेट घ्या असंच सांगत होते की असं मजेशीर मीम व्हायरल झालं.

पाकच्या फलंदाजांचे कंबरडे मोडणाऱ्या जेसन होल्डरची सुपारी द्यायची असल्याचा स्क्रीनशॉटसुद्धा लगेच फॉरवर्ड झाला.

सामन्याच्या तिसऱ्याच षटकात कॉटरेलने पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला शाय होपकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर रसेलनं फखर जमानचा त्रिफळा उडवला.  जमानने 22 धावा केल्या.

रसेलनं पाकला तिसरा दणका दिला. त्याने हॅरिस सोहेलला बाद केलं. त्यानंतर 3 बाद 45 वरून पाकिस्तानची अवस्था 8 बाद 81 अशी झाली.

वेस्ट इंडिजच्या थॉमसने पाकिस्तानला चौथा धक्का दिला. बाबर आझम 33 चेंडूत 22 धावा करून परतला. त्यानंतर कर्णधार सर्फराज अहमद जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

होल्डरने इमाद वसिमला गेलकडे झेल देण्यास भाग पाडलं. पुढच्या षटकात थॉमसने शदाब खानला पायचित केलं. तर होल्डरने हसन अलीला बाद केलं. हसन अलीने एकच धाव केली.20 व्या षटकात एक गडी बाद केल्यानंतर थॉमसने 22 व्या षटकात पाकचा शेवटचा गडी बाद केला.

पाकिस्तानकडून फखर जमान आणि बाबर आझम यांनी सर्वाधिक 22 धावा केल्या. पाकिस्तानचा तळाचा फलंदाज वहाब रियाजने केलेल्या फटकेबाजीने संघाचे शतक पूर्ण झाले. रियाजने 11 चेंडूत 2 षटकार आणि  एका चौकारासह 18 धावा केल्या. तर मोहम्मद अमीर 3 धावांवर नाबाद राहिला.

वेस्ट इंडिजकडून थॉमसने सर्वाधिक चार बळी घेतले. कर्णधार जेसन होल्डरने 3 तर आंद्रे रसेलनं 2 बळी घेतले. वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक शाय होपने यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने यष्टीमागे चार जणांचे झेल घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 05:17 PM IST

ताज्या बातम्या