World Cup : आफ्रिदीनं केला क्रिकेटच्या देवाचा अपमान!

आफ्रिदीनं निवडलेल्या सर्वकालिन वर्ल्ड कपच्या संघात पाकिस्तानच्या सर्वाधिक 5 तर भारताच्या फक्त एकाच क्रिकेटपटूला स्थान दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 10:28 PM IST

World Cup : आफ्रिदीनं केला क्रिकेटच्या देवाचा अपमान!

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीनं आतापर्यंतच्या सर्व क्रिकेटपटूंमधून वर्ल्ड कपचा संघ निवडला आहे.  विशेष म्हणजे या संघात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांना वगळले आहे.

शाहिद आफ्रिदीने निवडलेल्या 11 जणांच्या संघात 5 पाकिस्तानचे खेळाडू असून ऑस्ट्रेलियाचे 4 जण आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या केवळ एका खेळाडूचा समावेश आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 6 वर्ल्ड कपमध्ये खेळताना 2 हजार 278 धावा केल्या आहेत. तरीही सर्वकालिन संघात सचिनचा समावेश न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Loading...

बेस्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीलाही आफ्रिदीने संघात घेतलं नाही. 2011 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याशिवाय 2015 पर्यंत भारत सेमीफायनलला पोहचला होता. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.

आफ्रिदीने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा आपल्या संघात समावेश केला आहे.  कोहली 2011 आणि 2015 च्या वर्ल्ड कप संघात होता. 2019 चा वर्ल्ड कप भारत कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

शाहिद आफ्रिदीने निवडलेल्या संघात सईद अन्वर, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, वसिम आक्रम, ग्लेन मॅक्ग्रा, शेन वॉर्न, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक़ यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...