NZ vs SL : न्यूझीलंडचा दणदणीत विजय, श्रीलंकेचा 10 विकेटने पराभव

NZ vs SL : न्यूझीलंडचा दणदणीत विजय, श्रीलंकेचा 10 विकेटने पराभव

icc cricket world cup 2019 : NZvsSL live match : गोलंदाजांच्या कामगिरीनंतर मार्टिन गुप्टिल आणि कुलीन मुन्रो यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने लंकेवर दणदणीत विजय मिळवला.

  • Share this:

कार्डिफ, 01 जून : गोंलदाजांच्या जबरदस्त कामगिरीनंतर सलामीच्या जोडीने केलेल्या अभेद भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय मिळवला. लंकेनं दिलेलं 137 धावांचं आव्हान मार्टिन गुप्टिल आणि कुलिन मुन्रो यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. न्यूझीलंडने 16.2 षटकांत बिनबाद 137 धावा केल्या.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने लंकेला 136 धावांत रोखले. डावाच्या सुरुवातीलाच मॅट हेनरीच्या गोलंदाजीवर लंकेचा लाहिरू थिरिमाने पायचित झाला. पंचांनी पायचितचे अपिल फेटाळून लावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने डीआरएस घेतला. त्यानंतर पंचांना निर्णय बदलून लाहिरूला बाद दिले.त्यानंतर कुशल परेरा आणि करुणारत्ने यांनी 42 धावांची भागिदारी केली. 9 व्या षटकात पहिल्या चेंडूवर हेन्रीच्या गोलंदाजीवर परेरा तर दुसऱ्या चेंडूवर कुशल मेंडिस बाद झाला. यानंतर धनंजय डी सिल्वाला फर्ग्युसनने पायचित केलं. धनंजयनंतर आलेल्या मॅथ्यूजला ग्रँडहोमने लॅथमकरवी झेलबाद केलं. लंकेचा निम्मा संघ 15 षटकांत 60 धावांमध्ये तंबूत परतला.

मॅथ्यज बाद झाल्यानंतर एका धावेची भर घालून जीवन मेंडीस बाद झाला. त्याला फर्ग्युसनने बाद केलं तेव्हा संघांच्या 6 बाद 60 धावा झाल्या होत्या. त्यानंतर करुणारत्नेनं थिसारा परेराला साथीला घेत पडझड थांबवली. त्यांनी 52 धावांची भागिदारी केली. या दोघांची जोडी सँटनरने फोडली. त्याने परेराला ट्रेंट बोल्टकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर इसुरु उदाना आणि सुरंग लकमल लागोपाठ बाद झाले. त्यानंतर फर्ग्युसनने मलिंगाचा त्रिफळा उडवला. श्रीलंकेनं 29.2 षटकांत सर्वबाद 136 धावा केल्या. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने 3, फर्ग्युसनने 2 तर बोल्ट, ग्रँडहोम, निशाम, सँटनर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

लंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या टिम साउदी आणि हेन्री निकोलस यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. दोन्ही खेळाडू तंदुरुस्त नसल्याने त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. आतापर्यंत न्यूझीलंडने पाच वेळा सेमीफायनल गाठली असून गेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

श्रीलंकेनं 1996 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरला आहे. संघात अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरिमाने, कुशल मेंडिस, धनंजय डी सिल्वा हे फलंदाजा आहेत. पण न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजीचा ते कितपत सामना करतील हे सांगता येत नाही. याशिवाय गोलंदाजीची कमान लसिथ मलिंगा आणि सुरंगा लकमल यांच्याकडे असणार आहे.

VIDEO: कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी म्हटली 'कविता'

First published: June 1, 2019, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading