World Cup : क्रिकेटरच्या पत्नीनं बांगलादेशला डिवचण्यासाठी केला बोल्ड डान्स, VIDEO व्हायरल

World Cup : क्रिकेटरच्या पत्नीनं बांगलादेशला डिवचण्यासाठी केला बोल्ड डान्स, VIDEO व्हायरल

बांगलादेशला नमवत न्यूझीलंडचा संघ आता गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

लंडन, 07 जून : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या ICC World Cupमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशला 2 विकेटनं पराभूत केलं, आणि वर्ल्ड कपमधला आपला दुसरा विजय नोंदवला. या विजयासह न्यूझीलंडचा संघ आता पहिल्या क्रमांकावर आहे.या सामन्या दरम्यान बांगलादेश बाजी मारेल, असे वाटत असताना न्यूझीलंडनं सामना जिंकला. मात्र या सामन्यात मिचेल सेंटनर आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी संघाला विजयाच्या पार नेले.

मात्र, या सामन्यात एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. यावेळी दर्शकांमध्ये बसलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या पत्नीनं, बांगलादेशच्या खेळाडूंना डिवचण्यासाठी एक बोल्ड डान्स केला. न्यूझीलंडचा खेळाडू लॉकी फर्ग्यूसन याच्या पत्नीनं अश्लील नृत्य करत न्यूझीलंडच्या संघाचा विजय सेलिब्रेट केला. हा प्रसंग न्यूझीलंडच्या 47व्या ओव्हरमध्ये घडला. त्यावेळी बांगलादेशचा मोहम्मज सैफुद्दीन गोलंदाजी करत होता. त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी 24 चेंडूत 10 धावांची गरज होती. यावेळी मिचेल सेंटनर आणि मैट हेन्री क्रिजवर उपस्थित होते.मात्र मोक्याचीवेळी हेन्री बाद झाला. मात्र फर्ग्युसननं 47ओव्हरमध्ये सामना संपवला. यानंतर लॉकी फर्ग्यूसनच्या पत्नीनं केलेल्या या बोल्ड डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading...

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले


VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...