World Cup : VIDEO : होपनं उडवली होती झोप, थोडक्यात वाचला धोनी

World Cup : VIDEO : होपनं उडवली होती झोप, थोडक्यात वाचला धोनी

ICC Cricket World Cup भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला 8 धावांवर जीवदान मिळाले. वेस्ट इंडिजला सहज मिळालेली संधी साधता आली नाही.

  • Share this:

मँचेस्टर, 27 जून : ICC Cricket World Cup वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 268 धावा केल्या. विराट कोहली वगळता इतर फलंदाज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर फार काळ टिकू शकले नाहीत. सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव सावरला. पण राहुल बाद झाल्यानंतर विजय शंकरसुद्धा 14 धावांवर बाद झाला. विजय शंकरनंतर केदार जाधव धोनीच्या आधी फलंदाजीला आला. तो फक्त 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या धोनीची सुरुवात अडखळत झाली. त्याला 8 धावांवर असताना जीवदान मिळाले.

गेल्या सामन्यातील संथ खेळीवरून धोनीवर टीका केली जात आहे. तर या सामन्यातही त्याने धीमी सुरुवात केली. 14 चेंडूत 8 धावा काढल्या असताना धोनीला जीवदान मिळाले. 33 व्या षटकानंतर भारताच्या 4 बाद 154 धावा झाल्या होत्या. त्यावेळी धोनी आणि विराट मैदानात होते. वेस्ट इंडिजचा गोलंदाज अॅलनच्या चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याच्या नादात धोनी यष्टीचित झाला असता. मात्र, शाय होपच्या हातातून चेंडू सुटला आणि धोनी बाद होता होता वाचला.

अफगाणिस्तानविरुद्ध धोनीने 52 चेंडूत 28 धावा केल्या. राशिद खानच्या चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याच्या नादात धोनी बाद झाला. यष्टीरक्षक म्हणून धोनीचा दबदबा सर्वांनाच माहिती आहे. पण तोच राशिदच्या जाळ्यात अडकला आणि यष्टीचित झाला. त्याच्या कारकिर्दीत फक्त दुसऱ्यांदा तो बाद झाला आहे. याआधी तो 2011 मध्ये वर्ल्ड कपमध्येच बाद झाला होता.

वाचा- गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार?

वाचा- सामन्याआधीच भारतानं इंग्लंडला दिला दणका, हिसकावून घेतले पहिले स्थान

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या