VIDEO : धोनी तू असं का केलंस? नाराज चाहत्यांनी विचारला प्रश्न

VIDEO : धोनी तू असं का केलंस? नाराज चाहत्यांनी विचारला प्रश्न

क्रिकेट खूप खेळलो असं म्हणत धोनीने आता माझा आवडता छंद आणि ज्यात मला करिअर करायची इच्छा होती ते करणार आहे असं सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मे : आयपीएलनंतर क्रिकेटच्या महासंग्रामाला इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. 30 मे पासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू विश्रांती घेत आहेत. संघ व्यवस्थापनानेच त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून चाहते मात्र नाराज झाले आहेत. चाहत्यांनी ट्विटरवर #WhyDhoniWhy असंही विचारलं आहे.तुझी पेंटिंग्ज आवडतात पण तुझी संघाला गरज आहे असं चाहत्यांनी म्हटले आहे.

धोनीने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं  आहे की, मला लहानपणापासून पेंटिंगची आवड आहे. माझ्यासाठी काही चित्रे काढली आहेत असं म्हणत धोनीने काही पेंटिग्ज दाखवली. यात त्याने स्वत:चे पोर्ट्रेटसुद्धा काढल्याचं सांगितलं.

विशेष म्हणजे भारताला 2011 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या या माजी कर्णधाराने स्वत:चे पोर्टेट्र काढताना त्यात यष्टीरक्षक नाही तर फलंदाजी करत असलेलं दाखवलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळणार असून हा शेवटचा वर्ल्ड कप असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर संथ गतीने फलंदाजी करण्यावरून टीकाही होत आहे. मात्र, पोर्ट्रेटमधून फलंदाजी अजूनही शिल्लक असल्याचं तर दाखवत नाही ना? असेही चाहत्यांनी म्हटंल आहे.यावेळी धोनी म्हणाला की, क्रिकेट खूप खेळलो असं म्हणत आता माझा आवडता छंद आणि ज्यात मला करिअर करायची इच्छा होती ते करणार आहे. तसेच धोनीने पेंटिंग्ज काढल्यानंतर चित्रकारांना आवाहन केलं. तो म्हणाला की, माझी पेटिंग्ज बघा आणि त्यात काही बदल असतील तर सुचवा. कारण मी आता पेंटिंग्ज काढायचं मनावर घेतलं आहे.धोनीच्या काही चाहत्यांनी मात्र त्याच्या या गुणांचे कौतुक केलं आहे. धोनी काहीही करू शकतो असं म्हणत त्याच्या पेटिंग्जचे कौतुक केलं आहे.

VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यूबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या