धोनीनं लावली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO व्हायरल

धोनीनं लावली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO व्हायरल

बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने 95 धावांनी जिंकला. या सामन्यात धोनी आणि केएल राहुलने शतके केली.

  • Share this:

लंडन, 29 मे : भारताने इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेच्या आधी सुरु असलेल्या सराव सामन्यात बांगलादेशला 95 धावांनी पराभूत केलं. केएल राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 359 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 264 धावा करता आल्या.

धोनीच्या बांगलादेशविरुद्धच्या शतकी खेळीचं आणि षटकाराची चर्चा सुरु असताना आणखी एक गोष्ट व्हायरल होत आहे. भारताचा माजी कर्णधार, बेस्ट फिनिशर, कॅप्टन कूल अशी अनेक विशेषणं धोनीला लावली जातात. कर्णधारपदावरून बाजूला झाल्यानंतरही त्याच्यातले नेतृत्वगुण कमी झालेले नाहीत. अनेकदा मैदानावर तो कर्णधार विराट कोहलीला सल्ला देताना दिसतो. यष्ट्यांमागे उभा असलेला धोनी संघासाठी मार्गदर्शकाच्याच भूमिकेत असतो.

फलंदाजी करताना सहकाऱ्याला कसं खेळायला हवं याबद्दलही तो सांगत असतो. अनेकदा फॉर्ममध्ये नसताना त्याला निवृत्तीचा सल्लाही दिला गेला. तरीही धोनीने टीका करणाऱ्यांना आपल्या बॅटने आणि खेळातून उत्तर दिलं. बागंलादेशविरुद्धच्या सामन्यात तर क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहिलं नसेल अशी गोष्ट घडली.

वाचा : क्रिकेटपटूंच्या लकी गोष्टी, मैदानावर याशिवाय पाय ठेवत नाहीत हे खेळाडू

महेंद्रसिंग धोनी मैदानात फलंदाजीला असताना त्याने चक्क बांगलादेशची फिल्डिंग लावली. फलंदाजीवेळी धोनीच्या लक्षात आले की बांगलादेशने चुकीच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केले आहेत. तेव्हा त्याने गोलंदाजाला क्षेत्ररक्षणात बदल करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे बांगलादेशने धोनीने सांगितल्याप्रमाणे बदलही केला.

सामन्याच्या 39 व्या षटकात धोनी फलंदाजी करताना फिरकीपटू शब्बीर रहमान गोलंदाजी करत होता. तेव्हा रनअप घेणाऱ्या शब्बीरला धोनीने थांबवलं. धोनीने सांगितल्यानंतर बांगलादेशने त्यांच्या क्षेत्ररक्षणात बदल केला.

SPECIAL REPORT: पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती काँग्रेसची धुरा?

First published: May 29, 2019, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading