World Cup : सामन्याच्या दहाव्या चेंडूवर धोनीने गमावली संधी

World Cup : सामन्याच्या दहाव्या चेंडूवर धोनीने गमावली संधी

ICC Cricket World Cup 2019 : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने सामन्याच्या 10 व्या चेंडूवर आफ्रिकेच्या खेळाडूला बाद करण्याची संधी गमावली.

  • Share this:

साउथॅम्पटन, 05 जून : वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात भारताने आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला बाद करण्याची संधी गमावली. तरी या जीवदानाचा डी कॉकला फायदा उठवता आला नाही.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दुसरे षटक टाकले. त्यावेळी चौथ्या चेंडूवर डी कॉकने लेग साइडला चेंडू टोलावला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱी धाव घेताना केदार जाधवने सीमारेषेवरून फेकलेला चेंडू धोनीने पकडला आणि धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पण ग्लोवजमुळे त्याचा थ्रो लागला नाही आणि डीकॉक धावबाद होता होता वाचला.

दुसऱ्या षटकात मिळालेल्या जीवदानाचा डी कॉकला फायदा घेता आला नाही. त्याला जसप्रीत बुमराहने विराट कोहलीक़डे झेल देण्यास भाग पाडलं. त्याने फक्त 10 धावा केल्या. भारताविरुद्ध खेळण्याआधी डिकॉकने वर्ल्ड कपमधील दोन सामन्यात 68 आणि 23 धावा केल्या आहेत. मोठ्या स्पर्धेत त्याची कामगिरी फारशी चांगली नाही. त्याने मोठ्या स्पर्धेत खेळताना 22 सामन्यात 25.40 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर कारकिर्दीत त्याने 45.56 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत.

तत्पूर्वी, आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेला हा निर्णय महागात पडला. भारताच्या वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोलंदाजांनी आफ्रिकेला दणका दिला. पहिल्या दहा षटकांत जसप्रीत बुमराहने तर 20 व्या षटकात युझवेंद्र चहलनं आफ्रिकेच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवलं.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेच्या सलामीवीरांना बुमराहनं आपल्या तीन षटकांत माघारी धाडलं. हाशिम अमला 6 धावांवर बाद झाला. तर, क्विंटन डीकॉक 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करणाऱी जोडी युझवेंद्र चहलनं फोडली. त्यानं पहिल्यांदा डु प्लेसी आणि नंतर रॉसी वान डेर डुसेनला बाद केलं.

भारताने या सामन्यात दोन फिरकीपटूंना संघात घेतलं आहे. पण गेल्या 20 वर्षांत या मैदानावर फिरकीपटूंची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. इंग्लंडमधील मैदानांवर फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांनी जास्त यश मिळवलं आहे. त्या तुलने फिरकी गोलंदाजीला इथलं वातावरण अनुकूल नाही. या परिस्थितीतही भारताचे फिरकीपटू युझवेंद्र चहलने 2 तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 05:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading