IPl मध्ये रडला कुलदीप यादव, धोनीने पाठवला हा मेसेज!

IPl मध्ये रडला कुलदीप यादव, धोनीने पाठवला हा मेसेज!

आयपीएलमध्ये कुलदीप यादवला 9 सामन्यात फक्त 4 विकेट घेता आल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मे : आयपीएलच्या 12 व्या हंगामात भारताच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यामध्ये धोनी, विराट, शिखर धवन, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह यांनी मॅच विनिंग खेळी केल्या. मात्र यामध्ये भारताच्या एका खेळाडूला सूर गवसला नाही तो म्हणजे कुलदीप यादव.

आय़पीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने 9 सामन्यात फक्त 4 विकेट घेतल्या. एवढंच  नाही तर बेंगळुरुविरुद्ध एका षटकात 27 धावा दिल्या. त्यानंतर कुलदीप यादव मैदानावरच रडला होता. आता आयपीएल संपल्यानंतर कुलदीप यादवने खुलासा केला आहे की या कामगिरीनंतर धोनीने त्याचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत केली.

एका मुलाखतीत कुलदीप यादव म्हणाला की, मी नकारात्मक विचार करत नव्हतो मात्र सकारात्मक सुद्धा नव्हतो. त्यावेळी माझ्या एका षटकात इतक्या धावा गेल्यानं मी दु:खी झालो. मला माहिती होतं की मोइन अलीला आऊट करू शकतो पण प्लॅननुसार मला गोलंदाजी करता आली नाही आणि सामना हातातून गेला.

कुलदीप यादवला विचारण्यात आलं की, आयपीएलमधील कामगिरीनंतर आत्मविश्वासावर काही परिणाम झाला का? त्यावर उत्तर देताना कुलदीप म्हणाला, मी दु:खी होतो तेव्हा धोनीने मला एक मेसेज पाठवला. मला खेळावर लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं यामुळे खूप मदत झाली. मी पदार्पण केलं आहे तेव्हापासून धोनी माझ्या पाठिशी उभा राहिला आहे.

वाचा : धोनीच्या बाद होण्यावर कमेंट करणं 'या' क्रिकेटपटूला ठरतंय त्रासदायक

आयपीएलमध्ये कुलदीप यादवची चांगली कामगिरी झाली नसली तरी इंग्लंडमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केलाी आहे, त्याने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यात 9 विकेट घेतल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये कुलदीप यादव गेम चेंजर ठरू शकतो.

वाचा : IPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव?

VIDEO : बापरे! उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार

First published: May 16, 2019, 6:11 PM IST

ताज्या बातम्या