VIDEO : धोनीचा षटकार पाहून विराटही म्हणाला अबब!

VIDEO : धोनीचा षटकार पाहून विराटही म्हणाला अबब!

महेंद्रसिंग धोनी आणि केएल राहुलच्या शतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्य़ात बांगलादेशवर 95 धावांनी विजय मिळवला.

  • Share this:

लंडन, 29 मे : आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या आधी सराव सामन्यात धोनी त्याच्या जुन्या अंदाजात बघायला मिळाला. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात धोनीची फटकेबाजी पाहून कर्णधार विराट कोहलीनं जल्लोष केला. धोनीने फक्त 78 चेंडूत 113 धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना भारताची अवस्था 22 षटकांत 4 बाद 102 अशी झाली होती. संघाच्या 300 धावा होतील की नाही अशी शंका असताना मैदानात उतरलेल्या धोनीने सामन्याच्या 49 व्या षटकात अबू जायेदच्या जोरदार फटकेबाजी सुरु केली. त्याने 73 चेंडूत शतक साजरं केलं. यात धोनीने 7 उत्तुंग षटकार मारले. यातील एका षटकारानंतर चेंडूच मिळाला नाही.

चेंडूवर धोनीने 90 मीटर लांब षटकार मारला. यावेळी कोहलीने टाळ्या वाजवून धोनीच्या या फटकेबाजीवर प्रतिक्रिया दिली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना महेंद्रसिंग धोनी आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशसमोर 360 धावांचे आव्हान ठेवलं होतं. याचा पाठलाग करताना बांगलादेशला 264 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना 95 धावांनी जिंकला.

SPECIAL REPORT: पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती काँग्रेसची धुरा?

First published: May 29, 2019, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading