भारत वर्ल्ड कप जिंकणार! हा घ्या पुरावा

भारत वर्ल्ड कप जिंकणार! हा घ्या पुरावा

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनी 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.

  • Share this:

लंडन, 29 मे : आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या आधी कार्डीफ इथं झालेल्या सराव सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना महेंद्रसिंग धोनी आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशसमोर 360 धावांचे आव्हान ठेवलं होतं. याचा पाठलाग करताना बांगलादेशला 264 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना 95 धावांनी जिंकला.

भारताची अवस्था 22 षटकांत 4 बाद 102 अशी झाली होती. संघाच्या 300 धावा होतील की नाही अशी शंका असताना मैदानात उतरलेल्या धोनीने सामन्याच्या 49 व्या षटकात अबू जायेदच्या जोरदार फटकेबाजी सुरु केली. त्याने 73 चेंडूत शतक साजरं केलं. यात धोनीने 7 उत्तुंग षटकार मारले. यातील एका षटकारानंतर चेंडूच मिळाला नाही. चेंडूवर धोनीने 90 मीटर लांब षटकार मारला. धोनीने 78 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 113 धावा केल्या.

धोनीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मारलेला एक षटकार हा 2011 च्या फायनलला विजयी षटकारासारखाच होता. त्यानंत सोशल मीडियावर अनेक मीम व्हायरल झाली आहेत. भारत पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकणार असंही म्हटलं जात आहे.

धोनीने सराव सामन्यात शतक करण्याची ही दुसऱी वेळ आहे. याआधी त्याने 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 108 धावांची खेळी केली होती. धोनीने 64 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकार मारले होते. चेन्नईत झालेल्या या सामन्यात भारताने 5 बाद 360 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 117 धावांनी विजय मिळवला होता.

भारताने 2011 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत वर्ल्ड कप जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनी दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. 2011 च्या सराव सामन्यातील धोनीचं शतक आणि यंदा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील शतकाचा योगायोग जुळून आला तर भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकेल असं म्हणायला हरकत नाही.

SPECIAL REPORT: पृथ्वीराज चव्हाणांच्या हाती काँग्रेसची धुरा?

First published: May 29, 2019, 10:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading