लंडन, 08 जून : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून वाद निर्माण झाला आहे. आय़सीसीने धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या बलिदान लोगोला आक्षेप घेतला. बीसीसीआयला लोगो नसलेले ग्लोव्हज धोनीला घालण्यासाठी सूचनाही देण्यात आल्या. मात्र, बीसीसीआय या मागणीवर धोनीची बाजू घेत आय़सीसीची भेट घेणार आहे.
बीसीसआय आणि प्रशासन समितीने या प्रकरणी आयसीसीची समजूत घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी लंडनला पोहचले आहेत. या ठिकाणी ते आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून धोनीच्या ग्लोव्हजच्या मुद्यावर त्यांची परवानगी मिळवतील.
आय़सीसीच्या अधिकाऱ्यासोबत जोहरींची चर्चा भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी होणार आहे. बलिदान चिन्ह असेलेले ग्लोव्हज कोणत्याही प्रकारे आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करत नाहीत. ग्लोव्हजवर असलेले चिन्ह कोणत्याही धर्माशी जोडलेले नाही तसेच त्याला कमर्शियल महत्त्वही नाही.
धोनीने जर रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्हज घातले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकतो. जर त्यानंतरही धोनीने ग्लोव्हज घातले तर सामन्याच्या मानधनातील 25 टक्के रकमेचा दंड होईल. तिसऱ्यावेळी हाच दंड 50 टक्के तर चौथ्या सामन्यात 75 टक्के मानधन कापले जाईल.
वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन
वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'
SPECIAL REPORT : धोनीच्या ग्लोव्ह्जवरून का पेटला वाद, आयसीसीचा काय आहे आक्षेप?